Sunday, September 22, 2013

अखिल भारतीय कामकाजी महिला समन्वय समिती (सिटू) १० वे संमेलन

                  अखिल भारतीय कामकाजी महिला समन्वय समिती (सिटू) १० वे संमेलन 
               २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०१३ लक्ष्मी सेहगल नगर, जगन्नाथ पुरी, ओडिशा 
                                                            संयोजकांचा अहवाल 

कामगार महिला 
ह्या कालावधीत कामगार महिलांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. उलट बहुसंख्य कामगार महिलांसाठी कामाची व जगण्याची परिस्थिती अजूनच खालावली आहे. काजू, काथ्या, मळे, बिडी, मत्सोद्योग इत्यादींसारखी पारंपारिक क्षेत्र जिथे महिला मोठ्या प्रमाणात काम करतात, सरकारच्या धोरणांमुळे तसेच जागतिक व्यापार संघ आणि आसियान मुक्त व्यापार करार व जागतिक मंदीमुळे संकटात आली आहेत. परिणामी लाखो महिला कामगारांपासून त्यांचे रोजगार व उपजीविकेची साधने हिरावून घेतली जात आहेत. कामगार महिलांसाठी जे काही मोजके संरक्षक कायदे उपलब्ध आहेत ते असंघटीत क्षेत्रात प्रचंड मोठ्या संख्येने काम करणाऱ्या बहुसंख्य कामगार महिलांना लागूच नाहीत. संघटीत क्षेत्रातही विशेषतः सेझमध्ये, जिथे महिला मोठ्या प्रमाणात काम करतात, कायदे मोडणाऱ्यांना कोणतेही शासन न करता त्यांचे सरासर उल्लंघन करायची सरकार एक प्रकारे मुभाच देत आहे. सरकार स्वतःच खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांमध्ये अनिश्चित स्वरूपाच्या रोजगाराला उत्तेजन देत आहे आणि त्यांच्या स्वतःच्या खात्यांमध्ये, लाखो महिलांना कामाला तर लावत आहे परंतु त्यांना कामगार म्हणून अधिकार द्यायला मात्र नकार देत आहे. आजही कामगार महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पदोपदी भेदभावाचा सामना करावा लागतो. देशाच्या सर्व भागांमध्ये आणि सर्व क्षेत्रांमध्ये महिलांवर होणारा हिंसाचार, छळवणूक आणि कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ यात वाढ झाली आहे. त्यांना सुरक्षितता व भयमुक्त वातावरण देण्यासाठी सरकार कोणतीही परिणामकारक पावले उचलत नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी- II सरकारच्या ह्या दरम्यानच्या धोरणांचा पूर्ण भर आंतरराष्ट्रीय वित्त भांडवल आणि देशी, विदेशी बड्या औद्योगिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या मागण्या पूर्ण करण्यावरच राहिला आहे. सर्व सामान्य लोकांच्या व्यथांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. आपल्या राष्ट्रीय हितांची देखील ते तिलांजली देत आहेत.

 एकूण कामगारांमधील महिलांचे घटते प्रमाण 
अशी एक सामान्य धारणा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये महिलांसाठीच्या रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे आणि पूर्वीपेक्षा आता जास्त महिला काम करत आहेत. परंतु राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण संस्था (एनएसएसओ) च्या नुकत्याच प्रसारित केलेल्या आकडेवारी नुसार ही एक भाकडकथाच ठरली आहे. २०११-२०१२ मध्ये एकूण ४७.२९ कोटी कामगारांमध्ये महिला कामगारांची अंदाजे संख्या १२.९१ कोटी (२७.3%) होती तर २००४-२००५ मध्ये एकूण महिला कामगारांची संख्या १४.८५ कोटी होती. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की कामगार महिलांची एकूण संख्या गेल्या ५ वर्षात वाढण्याऐवजी जवळ जवळ २ कोटींनी घटली आहे. एनएसएसओ आकडेवारी स्पष्ट दर्शवतेय की गेल्या ३ दशकांपासून एकूण महिलांमधील कामकाजी महिलांचे प्रमाण घटत चालले आहे. १९८३ मध्ये ग्रामीण भागात एकूण महिलांच्या ३४% व शहरी भागात १५.१% महिला काम करत होत्या. पण २०११-१२ मध्ये हेच प्रमाण ग्रामीण भागात २४.८% आणि शहरी भागात १४.७% पर्यंत खाली उतरले. इथे ‘काम करणे’ म्हणजे महिलांचा दुय्यम काम म्हणजेच वर्षातील काही महिने किंवा काही दिवसांच्या तात्पुरत्या कामासहित कोणत्याही प्रकारच्या रोजगारात सहभाग असणे. २००९-१० आणि २०११-१२ ह्या दोन वर्षांमध्ये मुख्य रोजगारात गुंतलेल्या (म्हणजे वर्षातील मोठा हिस्सा काम करणाऱ्या) महिलांची संख्या ग्रामीण भागात ९० लाखांनी कमी झाली. शहरात किंचितश्या वाढलेल्या आकड्याने हा खड्डा भरून निघू शकत नाही. एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की ही भयावह घट अश्या काळात झाली आहे जेव्हा देशात आर्थिक विकासाचा दर तुलनेनी जास्त नोंदवला गेला होता. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनी नोंद केलेली आहे की महिलांच्या कामातील सह्भागामधील घट सर्व वयोगटातील, सर्व शैक्षणिक स्तरांमधील ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील महिलांमध्ये दिसून येते. महिला उच्च शिक्षणासाठी जात असल्यामुळे त्यांचा श्रमिक वर्गातील सहभाग कमी झाला असल्याचा तर्क चुकीचा आहे. तसेच कुटुंबाचे उत्पन्न वाढल्यामुळे महिला कामातून माघार घेत असल्याच्या तर्काशी देखील तज्ञांनी असहमती दर्शवली आहे. देशातील गरीबी, बेरोजगारी आणि रोजगाराच्या नुकसानाचे आकडे ह्या युक्तिवादाला दुजोरा देत नाहीत. २००४-०५ आणि २०११-१२ ह्या वर्षांच्या दरम्यान गेली कित्येक वर्षे देशाला ग्रासणाऱ्या कृषी संकटाच्या परिणामी शेतीत काम करणाऱ्या महिलांमध्ये २.६ कोटींनी घट झाली. पण महिलांच्या बिगर कृषी क्षेत्रातील रोजगारामध्ये देखील वाढ झालेली नाही. कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत प्रचंड घट, विस्तार सेवांमधील तीव्र कपात, यांत्रीकीकरणातील वाढ, ग्रामीण भागात सिंचन व वीज पुरवठा ह्या मूलभूत सुविधांमधील वाढीची धीमी गती इत्यादी गोष्टीमुळे कृषी संकट अजूनच गहिरे झाले आहे, परिणामी ग्रामीण भागातील रोजगारामध्ये अजूनच तीव्रतेने घट होत आहे. तरीदेखील अजूनही शेतीत काम करणाऱ्या ४३.६% पुरुषांच्या मानाने सर्व कामकरी महिलांपैकी शेतीत काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण कितीतरी जास्त म्हणजे ६२.७% आहे. संपूर्ण देशात कृषी क्षेत्रातील मजुरांपैकी ३५% प्रमाण महिलांचे आहे. २०११-१२ मध्ये ग्रामीण भागातील ५९.3% व शहरी भागातील ४२.८% महिला स्वयंरोजगारात गुंतलेल्या असल्याचे ह्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ह्या ‘स्वयं रोजगार’ करणाऱ्यांमध्ये स्वतः ‘मालक’ (ज्यांची टक्केवारी नगण्य म्हणजे १% आहे), ‘स्वतः खातेदार कामगार’ आणि ‘हेल्पर’ असे गट आहेत. यातील ‘मालक’ व ‘स्वतः खातेदार कामगार’ यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळतो पण ‘हेल्पर’ना मात्र कोणतेही वेतन मिळत नाही. ते विना मोबदला काम करतात. बहुतांश महिला ह्या ‘विना मोबदला’ गटात मोडतात. एका अंदाजानुसार १९९३-९४ पासून ते २०११-१२ पर्यंत ह्या विना मोबदला काम करणाऱ्या महिलांचे स्वयंरोजगारातील प्रमाण सातत्याने ७०% इतके राहिले. २००९- १० मध्ये ग्रामीण भागात त्यांचे प्रमाण ७१% इतके होते. स्वतः खातेदार कामगारांचे प्रमाण एक चतुर्थांश होते. शहरी भागात विना मोबदला काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण २००९-१० मध्ये ४०% होते. आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की ह्या विना मोबदला कामात स्वयंपाक, सफाई, बाल संगोपन इत्यादीचा समावेश नाही तर शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रांमधील आर्थिक कार्यकलापांबाबतचा हा उल्लेख आहे. त्यामध्ये वस्तू आणि सेवांचे देवाण घेवाणीसाठी उत्पादन, स्वतःच्या वापरासाठी उत्पादन आणि घरगुती उत्पादनामध्ये मजूर किंवा मुकादम ह्या नात्याने केलेल्या कामाचा समावेश होतो. ह्या महिला कामगार राष्ट्रीय उत्पन्नात मोलाची भर घालतात. पण त्यांना कोणतीही मजुरी किंवा व्यक्तिगत वेतन दिले जात नाही त्यामुळे त्या पितृसत्ताक वर्चस्वाच्या अंमलाखाली आर्थिक दृष्ट्या आश्रिताचे जिणे जगत राहतात. सर्वात ताज्या (२०११-१२) सर्वेक्षणानुसार फक्त १२.७% महिला कामगार ह्या नियमित वेतनभोगी कामगार आहेत. ग्रामीण भागात फक्त ८.७% तर शहरी भागात जास्त म्हणजे ४२.८% नियमित कामगार आहेत. पण ह्याच्यातही फार मोठा हिस्सा कामाची कोणतीही सुरक्षा नसलेल्या घर कामगारांसारख्या विविध प्रकारच्या कामगारांचा आहे. १.७३ कोटी महिला (सर्व महिला कामगारांपैकी १३.४% आणि शहरातील महिला कामगारांपैकी २३.६%) उत्पादनात काम करतात. २००४-०५ आणि २००९-१० ह्या दरम्यान उत्पादन क्षेत्रातील ३५ लाख महिलांकडून त्यांचा रोजगार हिरावून घेतले गेले. २००९-१० आणि २०११-१२ मध्ये त्यातील काही नोकऱ्या परत निर्माण झाल्या पण सर्व नाही. हे नव उदार अंमलामध्ये नोकऱ्यांचे स्वरूप किती लहरी आणि असुरक्षित झाले आहे ह्याचे द्योतक आहे. जागतिक आर्थिक मंदी आणि अस्थिर जागतिक मागणीच्या परिणामी अनेक पारंपारिक घरगुती उद्योग बंद पडले. घरातून उत्पादनाचे काम करून देण्याच्या आउटसोर्स केलेल्या कामांमध्ये देखील कपात झाली आहे. आउटसोर्स केलेल्या कामांसहित रोजगाराचे अनिश्चित आणि अस्थिर स्वरूप हे उत्पादन क्षेत्राचे एक कायम स्वरूपी लक्षण बनले आहे. आज बिडीव्यातिरिक्त शिलाई, लेस, पत्रावळ्या, फुलांचे हार, पतंग, कागदी पिशव्या, विजेची व इलेक्ट्रोनिक वस्तूंची जुळणी, खेळ साहित्य निर्मिती इत्यादी विविध क्षेत्रात घर खेप कामगार म्हणून काम करणाऱ्या लाखो महिलांना हे अत्यल्प मोबादाल्याचे कामही पुरेश्या प्रमाणात मिळत नाही. अश्या प्रकारे उत्पादन क्षेत्र कृषी क्षेत्रामधील कामातून बेदखल झालेल्या महिला कामगारांना रोजगार देण्यास अक्षम ठरत आहे. उत्पादन क्षेत्रात वर्षानु वर्षे काम करणाऱ्या महिला कामगार स्वतःच त्यांच्या रोजगाराच्या अस्थिरतेला तोंड देत आहेत. देशातील २.१९ कोटी कामगार महिला (एकूण कामगार महिलांपैकी १२.२ व शहरी कामगार महिलांपैकी ४२%) सेवा क्षेत्रात काम करत आहेत. त्यांमध्ये शिक्षण कर्मचारी, घरकामगार, विविध कार्यालयांमधील कर्मचारी, इतर सामाजिक किंवा व्यक्तिगत सेवा (अंगणवाडी, आरोग्य कर्मचारी इत्यादी) हे सर्व कामगार/कर्मचारी मोडतात. शहरातील बहुसंख्य सेवाक्षेत्र कर्मचारी सन्माननीय व सुरक्षित नोकरी करतात हा समज मात्र खरा नाही. विमा, बँक, राज्य व केंद्र सरकारी खाती, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये सेवा क्षेत्रातील एक अत्यंत छोटा हिस्सा काम करत आहे. उदाहरणार्थ माहिती आणि संपर्क क्षेत्रात शहरी महिला कामगारांपैकी फक्त २% महिला नोकरी करतात. एका स्वतंत्र सर्वेक्षणानुसार भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची त्यातील एकूण कर्मचाऱ्यांमधील टक्केवारी २०१० मधल्या २६% वरून २०१२ मध्ये २२% पर्यंत खाली उतरली आणि ते देखील अश्या काळात जेंव्हा त्या क्षेत्रातील एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली. सेवांमधील महिला कामगारांमध्ये प्रामुख्याने शिक्षण- (लाखो शिक्षण सेवकांसहित एकूण २५.४७%), व्यापार (१९.२६%), घर कामगार (१५.८८%). वित्त आणि विमा क्षेत्रात सेवा क्षेत्रातील मुश्किलीने ४.२६% महिला काम करतात. ह्या दरम्यान घर कामगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. देशातील घर कामगारांच्या एकूण संख्येबद्दल वेगवेगळे अंदाज केले जात आहेत. घर कामगारांची एकूण संख्या १९९९-२००० मधील १६.२ लाखांवरून २००९-१० मध्ये २५.२ लाखावर गेली. आयएलओ चा अंदाज ४२ लाख आहे तर काही संस्था अजून मोठी संख्या असल्याचा दावा करतात. अजून एक क्षेत्र असे आहे ज्यात महिला कामगारांची संख्या खूप वाढली आहे आणि ते म्हणजे बांधकाम. हे क्षेत्र ‘कायमचे तात्पुरते’ काम, कामगारांची खालावलेली परिस्थिती आणि त्याच वेळी बडे कॉर्पोरेटस् व स्थावर मालमत्ता विकसकांसाठी मात्र प्रचंड नफा कमावण्याचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. २००४-०५ पासून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या ५१ लाखांनी वाढली. एकूण बांधकाम कामगारांपैकी १५.६% महिला आहेत. ही वाढ काही प्रमाणात कदाचित महिलांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या कामांमध्ये मध्ये सहभाग वाढल्यामुळेही दिसत असावी. अजून एक महत्वाचा विभाग जो हल्ली प्रकाशझोतात आला आहे, परंतु ज्याला एनएसएसओच्या सर्वेक्षणात स्वतंत्रपणे गणती करण्याचा दर्जा दिला गेलेला नाही तो म्हणजे ‘योजना कर्मचारी’. भारत सरकार द्वारा आपल्या नागरिकांच्या पोषण, अन्न, शिक्षण, आरोग्य, रोजगार इत्यादी मूलभूत व अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक ‘योजना’ किंवा ‘कार्यक्रम’ चालवले जातात. सत्तेत असलेले पक्ष अश्या ‘योजना’ आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेतात, ज्या त्यांच्या लहरीनुसार कधीही मागे घेतल्या जाऊ शकतात. एका बाजूला लोकांची म्हणजेच लाभार्थींची फसवणूक केली जाते तर दुसऱ्या बाजूला ह्या ‘योजनांमध्ये’ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘कामगार’ म्हणून मान्यता दिली जात नाही. त्याना अनेक चित्र विचित्र नावांनी संबोधित केले जाते जसे ‘सामाजिक कार्यकर्ता’, ‘कार्यकर्ती’ ‘मित्र’, ‘अतिथी’, ‘स्वयंसेवक’ इत्यादी. भारत सरकारने चालवलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मध्यान्न भोजन कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, पोस्टल अल्प बचत योजना, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी (Agriculture Technology Management Agency- ATMA) इत्यादी योजनांमध्ये जवळपास 1 कोटी कर्मचारी काम करतात. योजना कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड मोठी संख्या महिलांची आहे. त्यांना ‘मानधन’ किंवा ‘प्रोत्साहन भत्ता’ या नावावर एक नगण्य अशी रक्कम दिली जाते. काहींना तर काहीच दिले जात नाही, उलट स्वतःच्या उपजीविकेसाठी लाभार्थ्यांकडूनच ‘युजर फी’च्या नावावर पैसे वसूल करायला सांगितले जाते. महिला, ज्या त्यांच्या स्वतःच्या कुटुंबात सर्वसामान्यपणे अन्न पुरवणे, मुलांची, वृद्धांची व आजारी व्यक्तींची काळजी घेणे इत्यादी कामांची जबाबदारी उचलतात, तेच काम त्यांनी समाजासाठी कुठल्याही वेतन किंवा सामाजिक सुरक्षा लाभांची अपेक्षा न ठेवता करावे यासाठी त्यांना बाध्य केले जाते. अश्या प्रकारे ज्या सरकारकडून ‘आदर्श मालक’ बनण्याची अपेक्षा ठेवली जाते, तेच सरकार ‘आदर्श शोषक’ ठरत आहे. महिलांच्या प्रामुख्याने ‘मुख्य दर्जा’ असलेल्या वर्षातील जास्त काळासाठी मिळणाऱ्या व चांगले उत्पन्न देणाऱ्या कामात घट झाली आहे. त्यामानाने ‘दुय्यम दर्जा’ असलेल्या म्हणजेच तात्पुरत्या, काही दिवसांसाठी मिळणाऱ्या व कमी उत्पन्नाच्या कामांमध्ये झालेली घट कमी आहे. बहुसंख्य महिला त्यांच्या कुटुंबाला जगविण्यासाठी मिळेल ते काम, मिळेल त्या वेळी, कोणत्याही अटीवर व परिस्थितीत करायला तयार होतात. एकूणच २००९-१० च्या उपलब्ध आकडेवारीनुसार फक्त १४% महिलांना त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यात मजुरी/वेतन मिळते त्या तुलनेत ५१% पुरुष कष्टाच्या मोबदल्यात वेतन मिळवतात. ८५% महिला आर्थिकदृष्ट्या संपूर्णपणे आश्रित होत्या आणि उत्पादनात मोलाची भर घालून देखील त्यांना कोणतेही वेतन/उत्पन्न मिळत नाही. ही परिस्थिती अश्या वेळी आहे जेंव्हा आपला देश सकल देशांतर्गत उत्पन्नवाढीचा (GDP) सर्वात जास्त दर मिळवत असल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. टोकाचे आर्थिक अवलंबित्व हे आपल्या समाजात असलेल्या महिलांच्या दुय्यम आणि खालावलेल्या दर्जाचे एक प्रमुख कारण आहे. हे दुय्यम स्थान कामगार महिलांच्या रोजच्या जीवनात अनेक अंगांनी व्यक्त होत असते. त्यांना आईच्या गर्भात आल्यापासून मृत्युपर्यंत, कामाच्या ठिकाणी, कुटुंबात, घरी व समाजात वाढत चाललेल्या बलात्कार, ऍसिड हल्ले अश्या हिंसक हल्यांच्या रूपाने, भेदभाव व त्रासांना तोंड द्यावे लागते. कामगार महिलांची परिस्थिती ९६% कामगार महिला असंघटीत क्षेत्रात काम करतात. बहुतेक कामगार कायदे त्यांना लागूच नाहीत आणि जे लागू आहेत ते देखील अंमलात येत नाहीत. बहुसंख्य कामगार महिलांना किमान वेतन, समान वेतन किंवा सामाजिक सुरक्षा लाभ मिळत नाहीत. बहुतेक महिलांना त्यांना लागू असलेल्या मातृत्व लाभ, पाळणाघर इत्यादी लाभांची माहितीदेखील नसते. अगदी संघटीत क्षेत्रातही असमान वेतन, बढती द्यायला नकार अश्या स्वरूपात भेदभाव होतच आहेत. संघटीत व असंघटीत अश्या दोन्ही क्षेत्रांमध्ये कामाच्या ठिकाणच्या लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. कामाचे जास्त तास, रात्रपाळी इत्यादीची सक्ती केली जाते मात्र स्वतंत्र स्वच्छता गृह, विश्राम कक्ष, पाळणाघर इत्यादींची व्यवस्था मात्र क्वचितच केली जाते.
समान वेतन समान वेतन कायदा, १९७६ नुसार समान व सारख्या स्वरूपाच्या कामाला समान वेतन देण्याची जबाबदारी मालकाची आहे. त्यात कामावर नेमणूक करताना पुरुष व स्त्री असा भेद न करण्याचेही निर्देश दिले आहेत. पण हा कायदा लागू होऊन ३७ वर्षे उलटली तरी अजूनही महिलांना विशेषतः असंघटीत क्षेत्रात त्याच कामाला पुरुषांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतनच मिळत आहे. श्रम ब्युरोनी एप्रिल २०१३ मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दशक भरात पुरुष व स्त्रियांच्या वेतानामधील फरक वाढत चालला आहे. ही आकडेवारी दर्शवते की नांगरणीसाठी पुरुषांना २१२ व स्त्रियांना १२३ रुपये; पेरणीसाठी पुरुषांना १८५ व स्त्रियांना १४८ रुपये तर कापणीसाठी पुरुषांना १७९ व स्त्रियांना १४९ रुपये मिळतात. विहीर खणण्यासाठी पुरुषांना २५४ रुपये मजुरी मिळत होती तर स्त्रियांना फक्त १३५. समान वेतन कायदा १९८७ मध्ये खास करून बढती, प्रशिक्षण किंवा बदलीबाबत होणारे भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने दुरुस्त करण्यात आला. पण तरीदेखील संघटीत क्षेत्रातही अजूनही असा भेदभाव सुरूच आहे. काही हलक्या आणि कमी पगाराच्या कामांवर ‘महिलांची कामे’ असा शिक्का मारून कामांची विभागणी करण्याची पद्धत अजूनही सुरुच आहे. ह्या कायद्याच्या उल्लंघनाबद्दल दंड करण्याचे प्रावधान असले तरी आजपर्यंत स्त्रियांच्या बाबतीत भेदभाव केल्याबद्दल एकाही मालकाला कधी शिक्षा झालेली नाही. समान वेतन कायद्या अंतर्गत गठीत करण्यात आलेली केंद्रीय सल्लागार समिती अजिबात काम करत नाही. बऱ्याच वर्षांपासून तिचे पुनर्गठन करण्यात आलेले नव्हते. ३ वर्षांच्या अवकाशानंतर फेब्रुवारी २०११ मध्ये तिची शेवटची बैठक झाली. बैठक घ्यायला लागलेला विलंब आणि बैठकीच्या वृत्तांतामधील तपशील सरकारच्या वरवरच्या हाताळणीचे निदर्शक आहेत. मातृत्व लाभ मातृत्व लाभाचा कायदा १९६१ पासून अस्तित्वात आहे. देशभरातील कारखाने, खाणी, मळे, घोडेस्वारी किंवा शारीरिक चपळतेचे सादरीकरण करणारे व्यवसाय, दुकाने व अन्य संस्था ह्या सर्वांना तो लागू आहे. जिथे मालक बालकाच्या जन्माआधीची व नंतरची मोफत आरोग्य सेवा पुरवत नाहीत तिथे बाळंतपणाच्या पगारी रजेबरोबरच मातृत्व भत्ता मिळवण्याचा अधिकार कामगार महिलांना देण्यात आला आहे. त्यात गर्भपात, गरोदरपण व बाळंतपण तसेच मुदतीआधी झालेल्या बाळंतपणामुळे झालेले आजारपणात सुट्टी, बाळ १५ महिन्यांचे होईपर्यंत स्तनपानासाठी कामामधून अवकाश आदींचे देखील प्रावधान आहे. त्याशिवाय ह्या कारणांसाठीच्या गैरहजेरीवरून महिलांना कामावरून न काढण्याचे देखील निर्देश ह्या कायद्याद्वारे मालकांना दिले गेले आहेत. उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते. २००८ मध्ये मातृत्व लाभ कायद्यात दुरुस्ती केली गेली. त्याअन्वये वैद्यकीय भत्ता २५० वरून १००० वर नेण्यात आला आणि ती रक्कम २०००० पर्यंत वाढवण्याची सरकारला मुभा देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निर्देशांनुसार बाळाला किमान ६ महिन्यांपर्यंत आईचे दूध पाजता आले पाहिजे ह्या दृष्टीकोनातून भारत सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बाळंतपणाची रजा ६ महिन्यांपर्यंत वाढवली. काही राज्य सरकारांनी देखील ती वाढवली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनिसांना देखील ६ महिन्यांची बाळंतपणाची रजा लागू आहे पण काही राज्यांमध्ये ती अंमलात येत नाही. परंतु बाळंतपणाची पगारी रजा व मातृत्व लाभ असंघटीत क्षेत्रातील महिला कामगारांसाठी अस्तित्वातच नाहीत. ह्या कायद्याचे बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या व सेझ सहित खाजगी क्षेत्रातील अनेक आस्थापने पालन करीत नाहीत. अगदी सरकार देखील त्यांच्या विविध ‘योजनांमध्ये’ काम करणाऱ्या, शालेय पोषण आहार कामगार, आशा, शिक्षण सेवक इत्यादी लाखो महिलांना ‘कर्मचारी’ म्हणून मान्यता देण्यास नकार देऊन बाळंतपणाच्या पगारी रजेपासून वंचित ठेवत आहे. पाळणाघर संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्यांसहित बहुतांश कामगार महिलांसाठी पाळणाघराची सुविधा उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील कामकरी महिलांना आपल्या लहान बालकांना मोठे भावंड, बहुतेक वेळा बहिणीकडे किंवा कुणा शेजाऱ्यांकडे सोडून कामावर जावे लागते. अनेकदा त्यामुळे मुलींना शाळा मधेच सोडून द्यावी लागते. हल्लीच सरकारने ५% अंगणवाड्यांचे पाळणाघरात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हे पुरेसे नाही. त्यायोगे फक्त काही थोड्या गरजू महिलांचीच नड भागू शकेल. शिवाय ह्या पाळणाघरातील कर्मचाऱ्यांची नेमणूक नियमित कर्मचारी म्हणून न करता ३००० रुपये मानधनावर केली जाणार आहे व त्यांना अन्य कोणतेही लाभ मिळणार नाहीत. शहरी भागात रुग्णालये, शाळा, दुकाने, कारखाने इत्यादींसारख्या विविध आस्थापनांपासून घर कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलांसकट कुणालाच सहज वापरता येण्यासारखी व परवडण्याजोगी पाळणाघराची सुविधा उपलब्ध नाही. कारखान्यांसाठीचा कायदा (The Factories Act) आणि बिडी व सिगार (कामाच्या शर्ती) कायदा मालकांना पाळणाघराची सुविधा पुरवण्याचे बंधन घालतो. मळे कामगार कायदा (The Plantation Labour Act) देखील असे बंधन घालतो की मालकाने महिला कामगारांना बालकांना स्तनपान करविण्यासाठी कामातून अवकाश दिला पाहिजे व जिथे ५० किंवा त्याहून जास्त महिला, अथवा ६ वर्षांखालील बालके असलेल्या २० हून अधिक महिला काम करत असतील तिथे मालकाने पाळणाघराची सोय केली पाहिजे. खाण विभाग पाळणाघर नियम, १९६६ (The Mines Crèche Rules, 1966 ) पाळणाघर तसेच बालके व स्तनदा मातांच्या आरोग्य तपासणीचे प्रावधान केले आहेत. पण ह्या प्रावधानांचे पालन केले जात नाही.

रात्रपाळीतील काम 
कारखान्यांसाठीचा कायदा (The Factories Act), १९४८ ने सायंकाळी ७ ते सकाळी ६ या वेळेत महिलांना कामाला लावण्यावर प्रतिबंध घातला आहे. राज्य सरकारला ही वेळ बदलण्याचा अधिकार आहे परंतु रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत स्त्रियांना काम करायची परवानगी देण्याचा अधिकार नाही. २००५ मध्ये सरकारने लोकसभेत ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून राज्य सरकारांना राजपत्रात अधिसूचना जाहीर करून रात्र पाळीची परवानगी देण्याची मुभा दिली आहे. त्यात कारखान्यापासून घराच्या जवळ वाहतुकीची सोय करण्याचेच फक्त प्रावधान आहे. आता अनेक राज्य सरकारांनी स्त्रियांकडून रात्रपाळीत काम करवून घेण्याची परवानगी दिली आहे. हजारो महिला आता रुग्णालये व सुश्रुषागृहाव्यतिरिक्त कापड, तयार कपडे, सेझ, मत्स्य प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान इत्यादी विभागांमध्ये रात्रपाळीत काम करत आहेत. त्यांना कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा अथवा घरापर्यंत वाहतुकीची सोय पुरविण्यात येत नाही. हे सर्वांना माहीतच आहे की बेंगळूरु, दिल्ली सारख्या अनेक शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिलांवर लैंगिक शोषण, हल्ले आणि अगदी हत्या सारख्या अत्याचारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. आपण स्त्रियांकडून रात्रपाळीत काम करवून घेण्यास सरसकट परवानगी देण्याला सातत्याने विरोध करत आलेलो आहोत. आपली मागणी आहे की कोणत्याही क्षेत्रात महिलांसाठी रात्रपाळीचे काम करवून घेण्याची परवानगी देण्या अगोदर त्यातील कामगार संघटनेला विश्वासात घेतले पाहिजे, नियोक्त्यांनी त्यांना घरापर्यंत सोडण्यासाठी वाहतुकीची सोय केली पाहिजे आणि रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांसाठी सुरक्षित कामाचे ठिकाण देण्याची हमी घेतली पाहिजे. आपल्या कामकाजी महिला समन्वय समित्यांनी जिथे जिथे महिला रात्रपाळीत काम करतात त्या त्या ठिकाणी ह्या मागण्यांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मोहिमा आखल्या पाहिजेत. विश्राम कक्ष व स्वच्छतागृह कारखाने आणि खाणी विषयक कायद्यांनुसार (Factories Act and the Mines Act) मालकांनी महिला कामगारांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोयीच्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था केली पाहिजे व त्यांची नीट देखरेख ठेवली पाहिजे. आंतर राज्य स्थलांतरित कामगार (कामाचे नियमन आणि सेवाशर्ती) कायदा, १९७९ मध्ये स्थलांतरित महिला कामगारांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृहांची व्यवस्था करण्याचे प्रावधान आहे. परंतु स्वतंत्र शौचालायासारखी मूलभूत निकडीची सोय देखील फक्त खाणी, कारखाने, शेती, बांधकाम, वीटभट्ट्या, दुकानांचे संकुल इत्यादी ठिकाणीच नाही तर शाळा, कार्यालये ह्या ठिकाणी सुद्धा बहुतांश कामगार महिलांना उपलब्ध नाही. त्यामुळे महिलांची केवळ गैरसोयच होते असे नाही तर त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. कामगार संघटना देखील हा प्रश्न तितक्या गंभीरपणे घेत नाहीत. सिटू संलग्न युनियन्स आणि कामकाजी महिला समन्वय समित्यांनी हे प्रश्न उचलले पाहिजेत.

लैंगिक छळ
संघटीत आणि असंघटीत दोन्ही क्षेत्रात कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची प्रकरणे वाढत चालली आहेत. एका खाजगी सर्वेक्षणानुसार ९१% महिलांना व १५ ते २० वर्षे वयोगटातील ९५% तरुण महिलांना पाठलाग केला जाणे, चिडवणे, किंवा लैंगिक छळ ह्या त्रासाला तोंड द्यावे लागते. पण ८८% महिला कधीही पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. फक्त २४% महिलांच्या कार्यालयांमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींचे निवारण करण्याची काहीतरी व्यवस्था होती. महिलांचा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मज्जाव आणि निवारण) एप्रिल २०१३ मध्ये ह्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाच्या १५ वर्षानंतर पारित करण्यात आला. ह्या कायद्यात लैंगिक छळाची व्याख्या शारीरिक स्पर्श आणि पुढाकार, किंवा लैंगिक संबंधांची मागणी वा विनंती किंवा लैंगिक अर्थाची शेरेबाजी करणे, अश्लील साहित्य दाखवणे, अन्य कोणतेही नकोसे वाटणारे शारीरिक, शाब्दिक किंवा शब्दात व्यक्त न केलेले लैंगिक स्वरूपाचे वागणे अशी व्यापक केली आहे. त्यात लैंगिक छळाच्या परिस्थितीची व्याख्या अशी केली आहे- खालील परिस्थितीत लैंगिक स्वरूपाचे वर्तन केले गेल्यास तो लैगिक छळ समजला जावा. महिलेला कामाबाबत खास प्राधान्य देण्याचे गर्भित वा स्पष्ट वचन देऊन; तिच्या कामाबाबत नुकसान करण्याची धमकी देऊन; तिच्या कामाच्या सध्याच्या किंवा भविष्यातील पदाबाबत धमकी देऊन; तिच्या कामात हस्तक्षेप करून किंवा तिच्यासाठी असुरक्षित, विरोधी व आक्रमक असे कामाचे वातावरण निर्माण करून; तिला अपमानास्पद वागणूक देऊन तिचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आणून इत्यादी. ह्या कायद्यात सर्व प्रशासकीय कार्यालय व शाखांमध्ये अंतर्गत तक्रार कमिटी व जिल्हा, नगरपालिकांमध्ये स्थानिक तक्रार कमिटीचे प्रावधान करण्यात आले आहे. कामगार संघटना व महिला संघटनांच्या आग्रहामुळे घर कामगार जिथे काम करतात त्या ‘राहण्याचे ठिकाण किंवा घर’ ह्याचा समावेश ‘कामाचे ठिकाण’च्या व्याख्येत करण्यात आला. परंतु ह्या कायद्यात ‘खोट्या किंवा खोडसाळपणे केलेल्या तक्रारीबद्दल किंवा बनावट वा दिशाभूल करणारी कागदपत्रे दिल्याबद्दल’ तक्रारदार किंवा साक्षीदाराविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आजही सामाजिक कलंक मानला जात असल्यामुळे फारच कमी महिला तक्रार करायला पुढे येतात. पीडित महिलेवरच दोषारोप केले जातात व तिला कुटुंब आणि समाजात प्रतिकूल परिणाम भोगावे लागतात. अश्या परिस्थितीत हे प्रावधान महिलांना लैंगिक छळाविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे येण्यासाठी बाधक ठरेल. कामगार संघटना आणि महिला संघटनांनी विरोध करूनदेखील हे कलम काढण्यात आलेले नाही. बाधित महिलेच्या ‘विनंती’ वरून का होईना, चौकशीच्या आधी ह्या प्रकरणात सलोख्याच्या मार्गाने तोडगा काढण्याच्या कलमाचा देखील पुनर्विचार केला पाहिजे.

महिला कामगारांना लागू असलेल्या कल्याणकारी योजना 
कामगार संघटनांनी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर २००८ मध्ये पारित झालेल्या असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा कायद्यामधील काही योजना असंघटीत क्षेत्रातील कामगार महिलांना लागू आहेत. काही बिडी आणि सिगार कामगार कल्याणकोष कायदा, इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकोष कायदा असे विभाग निहाय कल्याणकारी कायदे त्या विभागात काम करणाऱ्या महिलांना लागू आहेत. पण ह्यातील बऱ्याच कल्याणकारी योजना कागदावरच राहिल्या आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन, आम आदमी बिमा योजना, जननी सुरक्षा योजना, राष्ट्रीय स्वास्थ बिमा योजना, हातमाग विणकर सर्वंकष कल्याण योजना, मत्स्योद्योग कामगारांसाठी राष्ट्रीय कल्याण योजना अश्या काही योजना असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा कायद्याअंतर्गत लागू आहेत. परंतु ह्यातील बहुतांश योजना दारिद्र्य रेषेखालील कामगारांनाच लागू आहेत. भारत सरकार एका राष्ट्रीय योजनेचा जोरदार प्रचार करत आहे आणि फुशारक्या मारत आहे ती म्हणजे राष्ट्रीय स्वास्थ बिमा योजना. ह्या योजनेच्या अनेक मर्यादा लक्षात घेऊन देखील ही गोष्ट मान्य करावी लागेल की असंघटीत कामगारांच्या कुटुंबाला किमान काही आरोग्य सुविधा ही योजना देऊ शकलेली आहे. सुरवातीला फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठीच जाहीर झालेली ही योजना आता असंघटीत कामगारांच्या दारिद्र्य रेषेखालील व वरील अनेक विभागांना लागू करण्यात आली आहे. त्यांमध्ये किमान १५ दिवस काम केलेले मनरेगाचे मजूर, बांधकाम कामगार, घर कामगार, बिडी कामगार, सफाई कामगार, फेरीवाले, कचरावेचक, रिक्षा ओढणारे आणि ऑटो व टॆक्सी चालक असे अनेक विभाग त्यात मोडतात. त्यातील अनेक विभागांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात काम करतात. केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये काही राज्य पातळीवरील कल्याणकारी योजना कामगार महिलांसाठी लागू करण्यात आल्या आहेत. महिला मोठ्या संख्येने काम करत असलेल्या काही विभागांमधील कामगारांसाठी उदाहरणार्थ घर कामगारांसाठी राज्य पातळीवरील कल्याणकारी मंडळांचे देखील गठन करण्यात आलेले आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कामगार महिला किंवा एकूणच कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जे काही कायदे केले जातात किंवा कल्याणकारी योजना जाहीर केल्या जातात त्या काही सत्ताधारी वर्गाच्या उदारपणामुळे नाही तर कामगार संघटना, महिला संघटना आणि जनवादी चळवळीच्या दीर्घ काळापर्यंतच्या सातत्याच्या लढ्यांची व मोहिमांची ती निष्पत्ती आहे. सिटू अनेक वर्षांपासून सर्व असंघटीत कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करवून घेण्यासाठी लढा देत आहे. सिटू कमिट्या व कामकाजी महिला समन्वय समित्यांनी कामगार महिलांमध्ये सध्या लागू असलेल्या लाभांबाबत जागृती केली पाहिजे व ते प्रत्यक्ष पदरात पाडून घेण्यासाठी त्यांना एकत्रित केले पाहिजे. आपण संबंधित कायदा किंवा योजनेखाली कामगारांची नोंद करवून घेण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. त्याच बरोबर आपण ह्या प्रयत्नांच्या माध्यमातून त्या योजनांच्या मर्यादा देखील उघडकीला आणून सरकारच्या धोरणांबाबत त्यांच्यात जागृती केली पाहिजे व त्यांना ही धोरणे बदलायच्या लढ्यामध्ये उतरवले पाहिजे.
महिलांना लाभ देणाऱ्या व लाखो महिलांकडून त्यासाठी काम करवून घेणाऱ्या अन्य महत्वाच्या योजना महणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) व राष्ट्रीय ग्रामीण आरीग्य अभियान (एनआरएचएम). ह्या योजनांमध्ये अंगणवाडी कर्मचारी व आशा मिळून जवळपास ३५ लाख महिला काम करत आहेत. त्यांना ‘मानधन’ किंवा ‘प्रोत्साहन भत्ता’ म्हणून एक दयनीय रक्कम दिले जाते. कर्मचारी म्हणून मान्यता, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा मिळविण्यासाठी तसेच ह्या योजनांच्या खाजगीकरणाविरुद्ध त्या सातत्याने लढा देत आहेत. सरकार माध्यमांमध्ये ह्या योजनाबद्दल मोठमोठे दावे करत आहे पण ह्या योजनांसाठी पुरेसा निधी मात्र मंजूर करत नाही. अंमलबजावणीतही अनेक दोष आढळून येतात. परिणामी ह्यात काम करणाऱ्या महिला ह्या योजनांचा दर्शनी चेहरा असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते. ह्या योजनांच्या लाभार्थींमध्ये देखील कामकरी महिलांचाच भरणा अधिक आहे. कामकाजी महिला समन्वय समित्या आणि ह्या योजना कर्मचाऱ्यांच्या युनियन्सनी कर्मचारी आणि लाभार्थी महिलांमध्ये एकजुटीचे दृढ संबंध विकसित केले पाहिजेत. ह्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या प्रयत्नांबरोबरच लाभार्थ्यांमध्ये त्या योजनांच्या मर्यादा व कमजोऱ्या व त्यांना खिळखिळे करणारी सरकारची धोरणे उघडकीला आणणेही तितकेच आवश्यक आहे. ह्या योजना वाचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या लढ्यात लाभार्थ्यांचा पाठींबा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत.

महिलांविरुद्धचा हिंसाचार
गेल्या काही दिवसांमध्ये स्त्रिया व मुलींवर होणाऱ्या हिंसाचारात भयावह वाढ झाली आहे. लैंगिक अत्याचार, बलात्कार, सामुहिक बलात्कार आणि महिला आणि लहान मुलींच्या हत्या, ऍसिड हल्ले इत्यादींची पूर्ण देशभरातून नोंद होत आहे. जवळ जवळ एक तृतीयांश महिलांना लैंगिक किंवा शारीरिक हिंसाचाराला बळी पडावे लागते. महिलांच्या हत्यांपैकी ३८% हत्या त्यांच्या जिवलग साथींकडून केल्या जातात. प्रत्येक ३ मिनिटाला महिलांविरुद्धचा एक गुन्हा घडतो, प्रत्येक ९ मिनिटाला एक महिला पती किंवा नातेवाइकांच्या क्रूरतेला बळी पडते. प्रत्येक २९ मिनिटांना एका महिलेवर बलात्कार होतो आणि प्रत्येक ७७ मिनिटांना देशात एक हुंडाबळी घडून येत असतो. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या २०१३ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात १९७१ ते २०१२ या दरम्यान बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये ९०२% नी वाढ झाली. २०१० मध्ये बलात्कार, लैंगिक हल्ले, छळ आणि महिलांना पळवून नेण्याचे वर्षभरात २.१३ लाख म्हणजे रोज सरासरी ५८५ गुन्हे घडले. हा खऱ्या आकड्याचा केवळ एक छोटा अंशच आहे कारण बहुतांश महिला तक्रार न नोंदवता गप्प बसून सहन करतात. ही धक्कादायक आकडेवारी म्हणजे आपल्या देशातील महिलांच्या दर्जाचेच प्रतिबिंब आहे. सर्व मानवी नाती व भावनांचे वस्तूकरण आणि व्यापारीकरण, स्त्रियांचे व त्यांच्या शरीराचे अश्लील चित्रण इत्यादी गोष्टींवर भर देणाऱ्या जागतिकीकरणाच्या नवउदार धोरणांमुळे आधीच पितृसत्ताक समाजात प्रचलित असलेल्या स्त्रियांवरील लैंगिक हिंसाचारात प्रचंड वाढ झाली आहे. युनिसेफच्या किशोरवयीन मुला, मुलींबाबतच्या जागतिक अहवालामुळे पितृसत्ताक वृत्तीची पातळी कळून येते, ज्यात नमूद केले आहे की भारतात ५७% किशोरवयीन मुले व ५३% किशोरवयीन मुली असे मानतात की पतीने पत्नीला मारण्यात कोणताही अन्याय नाही. ज्याचे प्राबल्य आज वाढत चालले आहे अश्या कंत्राटी, प्रासंगिक, रोजंदारी किंवा तात्पुरत्या प्रकारच्या रोजगारातील महिला, आणि स्थलांतरित महिला कामगार लैंगिक छळाला सहज बळी पडू शकतात. आर्थिक शोषणाबरोबरच त्यांना मुकादम, ठेकेदार आणि मालकाच्या लैंगिक छळाला देखील बळी पडावे लागते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि खाजगीकरण, सार्वजनिक स्वच्छतागृहांची अनुपलब्धता, वीजपुरवठा नसणे ह्यामुळे कामगार महिलांच्या असुरक्षिततेत अजूनच वाढ होत आहे. महिलांवरील वाढता हिंसाचार हे महिलांनी सार्वजनिक अवकाशावर हक्क दाखवल्याबद्दल आणि नवउदार अंमलाखाली आधीच आक्रसत चाललेल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी शर्यतीत उतरल्याबद्दल वाटणाऱ्या असहीष्णुतेचेच प्रतिबिंब आहे. काही मोजक्या महिला आपले आर्थिक स्वातंत्र्य ठामपणे बजावण्याच्या स्थितीत आल्यामुळे वाटणारी असूया, मग त्या तसे वागो अथवा न वागो, ह्या हिंसाचारातून व्यक्त होते. हे अजूनही समाजात महिलांबाबत व्यापकपणे प्रचलित असलेल्या पितृसत्ताक वृत्तीचे द्योतक आहे. कामकाजी महिलांची बालके देखील हिंसा आणि गैरवर्तनाला बळी पडतात. परंतु बाजारवादी विचारसरणीशी बांधील असलेले सरकार आपल्या नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याच्या मूलभूत सामाजिक जबाबदारीमधून माघार घेत आहे दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या भयानक घटनेमुळे देशभर संतापाची आणि तीव्र विरोधाची लाट उसळली. त्या पार्श्वभूमीवर सरकारने गठीत केलेल्या न्यायमूर्ती वर्मा कमिटीने काही अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. सध्या असलेल्या कायद्याची मुळातून संपूर्ण तपासणी, तपासाच्या, खटला चालवण्याच्या पद्धतीत बदल ह्या त्यातील काही शिफारसी आहेत. कमिटीने महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठीच्या अगोदरच्या शिफारसींकडे दुर्लक्ष करण्यात सरकारने दाखवलेल्या निष्ठुरतेबद्दल सरकारचे वाभाडे काढले आहेत. त्यानंतर सरकारने गुन्हेगारी कायदे(दुरुस्ती) कायदा पारित केला ज्यात पाठलाग, धोका पोहोचवणे, ऍसीड हल्ले आदी कृत्यांसाठी देखील कारवाईचे प्रावधान आहे. खरे तर सर्वात चिंतेची बाब आहे बलात्काराच्या प्रकरणांमध्ये सजा लागण्याचे अत्यल्प प्रमाण. एका अहवालाप्रमाणे सजा लागण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमालीचे घसरले आहे. २०१० मध्ये अनेक राज्यांमध्ये हे प्रमाण फक्त १५% होते. हलक्या प्रतीचा तपास आणि पुरेश्या निधीचा अभाव ही त्याची प्रमुख कारणे आहेत. हे एकप्रकारे बलात्कार आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीचे प्रतिबिंब आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॆनर्जी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा सहित काही प्रमुख राजकीय नेते त्यांच्या असंवेदनशील शेरेबाजीमुळे समाजात अजूनही आणि सरंजामी वृत्ती असल्याचेच प्रमाण देतात. सत्ताधाऱ्यांच्या अश्या वक्तव्यामुळे पोलीसांच्या क्रीयाशून्यतेला चालना मिळते. ही वृत्ती पाहता महिलांसहित सर्व समाजात प्रचलित असलेल्या पितृप्रधान व सरंजामी विचारसरणी विरुद्ध लढा मजबूत करण्याची गरज अधोरेखित करते. कामगारांची परिस्थिती संपुआ II सरकारच्या धोरणांमुळे कामगार महिलांवरीलच नव्हे तर संपूर्ण कष्टकरी जनतेवरील ओझ्यात वाढ झालेली आहे. वेतन मिळवणाऱ्या असो वा नसो, संघटीत क्षेत्रात असो वा असंघटीत, शेतीत असो, उत्पादनात वा सेवा क्षेत्रात, ९९% पेक्षा अधिक कामगार महिलांवर, त्यांच्या कष्टकरी भावांप्रमाणेच केंद्रात एका पाठोपाठ आलेल्या सरकारांनी राबवलेल्या नवऊदार धोरणांचा विपरीत परिणाम झाला आहेच. परंतु समाजातील त्यांचे दुय्यम स्थान आणि त्यांच्या विशिष्ठ गरजा पाहता ह्या धोरणांचा कामगार महिलांवर होणारा परिणाम सर्वात वाईट आणि बहुतेक वेळा त्यांना उद्ध्वस्त करणारा असतो. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याच्या फुशारक्या मारत असला तरी संपुआ II च्या अंमलाखालील भारत राजकीय, आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांच्या बाबतीत अमेरिकन साम्राज्यवादाच्या दबावापुढे जास्तच झुकत चालले आहे. भाववाढ वस्तूंची, विशेषतः सर्व अत्यावश्यक वस्तूंची भाववाढ ही आज लोकांसमोरील सर्वात गंभीर समस्या आहे. कामगार महिलांसाठी ती अजूनच जास्त तीव्र आहे कारण त्यांना आपल्या कुटुंबाचे भरण पोषण करावे लागते. ह्या दरम्यान अन्नपदार्थांचे भाव आकाशाला भिडले आहेत. ह्याचा विशेष परिणाम स्त्रियांच्या अन्नसेवन आणि पोषणाच्या स्तरावर होतो. आणि अर्थातच त्याचा प्रभाव त्यांच्या बालकांच्या पोषणाच्या स्तरावर पडतो. ६६व्या एनएसएसओ सर्वेक्षणावर आधारित अहवालानुसार आपल्या देशातील पोषण सेवनाचा स्तर १९७२-७३ आणि २००९-१० दरम्यान सातत्याने खालावत आहे. ही घट १९९३-९४ ते २००९-१० यादरम्यान जास्त तीक्ष्ण होती. प्रथिनांचे सेवनही ह्या दरम्यान कमालीच्या तीव्रतेने घटली. हा अहवाल जरी स्त्रिया व पुरुषांचे स्वतंत्र आकडे देत नसला तरी आपण अनुमान काढू शकतो की त्यातही स्त्रियांच्या पोषणातील घट जास्तच तीव्र असणार आहे हे केवळ एकाच आकड्यावरून सिद्ध होते. ग्रामीण भागातील ६०% तर शहरी भागातील ५४% गरोदर स्त्रिया रक्तक्षयाने बाधित आहेत. ही भाववाढ अपघाताने किंवा पुरवठ्याच्या कमतरतेमुळे झालेली नाही. सरकार जाणून बुजून सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडकळीला आणून भाववाढीला चालना देणारी धोरणे राबवत आहे. बडे व्यापारी व कॉर्पोरेट कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी सरकार अन्नधान्याच्या भविष्यातील व्यापारास म्हणजेच सट्टेबाजीस प्रोत्साहन देत आहे. इंधन आणि खतांवरील अनुदानात प्रचंड कपात, वीज, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचे विनियंत्रण, अनुदानित गॆस सिलेंडरच्या संख्येत कपात आदी गोष्टींमुळे भाववाढीला चालना मिळून सामान्य लोकांवर त्याचे ओझे टाकले जाते.

अन्न सुरक्षा
संपुआ II सरकारने सत्तेत आल्यानंतर १०० दिवसांच्या आत अन्न सुरक्षा कायदा पारित केला जाईल असे वचन दिले होते. इतकी वर्षे त्यांनी टाळाटाळ केली, आणि आता लोकसभेच्या निवडणुकांवर डोळा ठेऊन त्यांनी अन्न सुरक्षेवर अचानक एक वटहुकुम जारी केला, जेंव्हा लोकसभेचे अधिवेशन एका महिन्यात भरणारच होते. ह्या वटहुकुमात अनुदानित दरात प्रती व्यक्ती फक्त ५ किलो तांदूळ किंवा गव्हाचे प्रावधान आहे तेही फक्त ६७% लोकसंख्येसाठीच. त्याची व्याप्ती सार्वत्रिक नसल्यामुळे ज्या राज्यांमध्ये सार्वत्रिक रेशन व्यवस्था आहे त्यांच्यावर उलट प्रतिकूल परिणाम होणार आहे. लक्ष्य आधारित व्यवस्थेत नेहमीच गरजूंमधला एक विभाग वगळला जात असतो. डाव्या पक्षांनी सातत्याने सार्वत्रिक सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून २ रु. किलोने प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला ३५ किलो धान्य देण्याची मागणी लावून धरली आहे. सरकार भविष्यात आधार कार्डांचे काम पूर्ण झाल्यावर अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याचाही विचार करत आहे. नवउदार धोरणांशी घट्ट बांधिलकी असलेल्या सरकारवर जबरदस्त प्रभाव असलेली जागतिक बँक, रोख हस्तांतरणाच्या कल्पनेची जोरदार वकिली करत आहे. काही जिल्ह्यांमध्ये ह्या आधीच ‘आधार’ आधारित थेट लाभ हस्तांतरण योजना ‘आपके पैसे आपके हाथ’ ही जोरदार घोषणा देत सुरु करण्यात आलेली आहे. ही योजना आता देशातील ७८ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, वृद्धापकाळ, विधवा व अपंग पेन्शन आदींसाठी राबवली जात आहे. परंतु रोख हस्तांतरणाला पाठींबा देणाऱ्या नांदी फौन्डेशनसारख्या काही संस्थांनी देलेल्या सर्वेक्षणासहित कित्येक सर्वेक्षणांमध्ये हे दिसून आले आहे की ९५% महिलांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या जागी रोख हस्तांतरणाची व्यवस्था आणायला विरोध केला. त्यांच्या रोजच्या अनुभवावरून त्यांना असे दृढतेने वाटते की पुरुषांच्या हातात गेलेला पैसा मूलभूत गरजा भागवण्यासाठी खर्च होत नाही. पिण्याच्या पाण्यापेक्षादेखील दारू मुक्तपणे उपलब्ध करून देण्यासाठी बांधील असलेल्या सरकारच्या राज्यात पुरुषांच्या हातात पैसे येणे म्हणजे दारूच्या दुकानासाठी पैसे आणि कुटुंबासाठी भूक असे त्यांना स्पष्टपणे वाटते. संयुक्त कामगार चळवळीच्या सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करायच्या मागणीला लोकांकडून खूपच व्यापक पाठींबा मिळाला. आपल्याला ह्या मागणीवरील मोहीम अजूनच बळकट केली पाहिजे.

वाढती बेरोजगारी
एनएसएसओची आकडेवारी दर्शवते की रोजगारवाढीच्या २०००-२००५ मधील २.७% ह्या दरामध्ये घट होऊन २००५-१० मध्ये तो केवळ ०.८%च राहिला. आपल्याला नोंद घेतली पाहिजे की ही घट अश्या कालावधीत होती जेंव्हा देशात सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) ८.५% सरासरी वार्षिक वाढीचा दर नोंदला गेला. जो त्याअगोदरच्या २०००-२००५ ह्या ५ वर्षांतील वाढीच्या दरापेक्षा कितीतरी जास्त होता. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे १५-२९ वयाच्या तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण तुलनेनी एकूण लोकसंख्येतील बेरोजगारीच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. शिक्षित तरुणांमध्ये हे अजूनच जास्त आहे. ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेपर्यंत शिकलेल्या युवकांमध्ये बेकारीचे प्रमाण ८% तर शहरामध्ये १०% आहे. ग्रामीण व शहरी भागातील शिक्षित महिलांमध्ये ते अनुक्रमे १८% आणि २३% आहे. सध्याच्या विकासाची झेप कितीही मोठी असली तरी ती रोजगारविहीन वाढ आहे हेच ह्यातून सिद्ध होते. विकोपाला गेलेले दारिद्र्य आणि विस्तारणारी विषमता रोजगारात घसरण होत असताना आणि बहुतांश कामगारांचे वेतन बाजारभावा पेक्षा खूप पिछाडीवर असताना, सरकार विशेषतः योजना आयोग, चमत्कारिकपणे हा दावा करत आहे की गरीबीत वेगाने घट होत चालली आहे. अधिकृत दारिद्र्य रेषेची व्याख्या प्रती व्यक्ती उत्पन्न/खर्च ग्रामीण भागात २२.४ आणि शहरी भागात २८.६ रुपये इतक्या हास्यास्पदरित्या खालच्या पातळीवर ठेवूनच योजना आयोगाने ही युक्ती साधली आहे. विषमता असहनीय पातळीपर्यंत वाढली आहे. २०१३ला प्रकाशित झालेल्या जागतिक पातळीवरील फोर्ब्सच्या यादी नुसार सर्वात श्रीमंत लोक अधिकच संपन्न झाले आहेत. संपूर्ण जगातील एकूण ७.२ अब्ज लोकांपैकी १४२६ व्यक्तींकडे ५.४ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची संपत्ती होती. त्यांची एकत्रित संपत्ती मागच्या वर्षीच्या ४.६ च्या मानाने वाढली. (१ ट्रिलीयन अमेरिकन डॉलर= १ लाख कोटी अमेरिकन डॉलर. याचा अर्थ १४२६ व्यक्तींची एकूण संपत्ती रुपयांमध्ये ३२४० लाख कोटी म्हणजेच भारताच्या २०१३-१४च्या वार्षिक बजेटच्या १९४ पट आहे.) भारतातील अमेरिकन डॉलर अब्जाधीशांची (बिलीयनैर) संख्या २०११ मध्ये आणि २०१३ मध्ये देखील ५५ आहे. मुकेश अंबानी जे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांचा जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत २२वा क्रमांक आहे. त्यांची संपत्ती २१.५ बिलियन अमेरिकन डॉलर आहे म्हणजेच भारताच्या २०१३-१४च्या बजेटच्या ७७ पट! त्यांचे मासिक वेतन (अन्य लाभ सोडून) १.२५ कोटी आहे. म्हणजेच प्रत्येक दिवसाचे ४.८० लाख रुपये. भारतीय वंशाचे स्टील सम्राट लक्ष्मी मित्तल १६.५ बिलियन अमेरिकन डॉलरवर (बजेटच्या ६० पट) ४१व्या क्रमांकावर आहेत, सावित्री जिंदाल ७.६ बिलियन अमेरिकन डॉलरवर (भारतीय बजेटच्या १७.३८ पट) जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत १७व्या आणि भारतातील श्रीमंतांमध्ये ७व्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या टोकाला ग्रामीण भागातील सर्वात गरीब १०% लोकसंख्या रोज दर दिवशी १५ रुपयांवर गुजराण करते तर शहरी भागातील सर्वात गरीब १०% लोकसंख्या रोज दर दिवशी २० रुपयांवर गुजराण करते. २००९-१० मध्ये आपल्या देशातील ३८ कोटींपेक्षा जास्त लोक ग्रामीण भागात दर महिना ७६३ व शहरी भागात ८६० रुपयांवर स्वतःला जगवतात अशी माहिती लोकसभेत दिली गेली. हे लोक काही स्वस्थ बसून रहात नाहीत तर ते काम करून राष्ट्रीय उत्पादनात व सरकारी तिजोरीत भर घालतात. पण त्यांच्या कष्टाचे फळ हिसकावून घेऊन त्यांना गरीबच ठेवण्यासाठी सरकारची धोरणे श्रीमंतांना मदत करतात. 

कामगारांच्या अधिकारांवर हल्ले
कामगार कायद्यांचे पालन न करणे ही गोष्ट काही फक्त कामगार महिलांपुरती मर्यादित नाही. देशातील सर्व कामगार कायदे- किमान वेतन, कामगारांची नोंद ठेवणे, कामाचे तास, कंत्राटी काम, सामाजिक सुरक्षा, सुरक्षितता आणि कामगारांचे संघटीत होण्याचा व सामुहिक सौदेबाजीचा अधिकार आदी सर्वांचे सर्रास उल्लंघन होत आहे. कायद्याचे पालन करवून घेणारी यंत्रणा ह्या कामात नेहमीच मालकांना साथ देते. कायदा मोडणाऱ्या मालकांविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही. उलट कायद्याच्या पालनाचा आग्रह धरणाऱ्या कामगारांवरच पोलीस आणि मालकांचे गुंड हल्ले करतात. औद्योगिक तंट्यांमध्ये मालकांच्या बाजूने हस्तक्षेप करणे हे पोलिसांचे नेहमीचेच काम झाले आहे. औद्योगिक तंट्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बनवून त्यांना हाताळण्यासाठी बळाचा वापर वाढत चालला आहे. आपल्याला हवी ती युनियन निवडून त्यात सामील होण्याच्या व सामूहिक वाटाघाटी करण्याच्या कामगारांच्या मूलभूत अधिकारावर भीषण हल्ले होत आहेत. कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांचे पोलीस कस्टडीत मारहाणीमुळे मृत्यू, पोलिसांच्या समोर खाजगी सुरक्षा रक्षकांच्या हातून हत्या आणि व्यवस्थापकाच्या कक्षात खून अश्या घटना वाढत आहेत. कामगार कायद्यांमध्ये जे काही सुरक्षेचे उपाय उपलब्ध आहेत ते मोडकळीला आणून कामगारांना हवे तेंव्हा कामावर ठेवण्याचे व काढून टाकण्याचे अधिकार मालकांना देण्याचे भयानक प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. पंजाब आणि महाराष्ट्र सरकारने कामगारांचे कामगार संघटना अधिकार मर्यादित करण्यासाठी व संप करण्याच्या अधिकारावर गदा आणण्यासाठी कायदेशीर उपाय केलेले आहेत. निर्यात प्रक्रिया विभाग (EPZs- Export Processing Zones), सेझ (SEZs- Special Economic Zones), निर्यात केंद्रित युनिट्स (EOUs- Export Oriented Units) आणि आता राष्ट्रीय गुंतवणूक व उत्पादन विभाग (NIMZs- National Investment and Manufacturing Zones) इत्यादी विशेष विभाग, राष्ट्राच्या जीवावर बड्या राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्यांना प्रचंड सवलती देण्यासाठीच निर्माण करण्यात आले आहेत. ह्या विभागांमध्ये कामगार कायदे पाळले जात नाहीत. मालकांना कामगारांच्या अधिकारांचे हनन करण्याचे स्वातंत्र्य देऊन सरकार संपूर्ण देशाला मालकांसाठी स्वर्ग बनवू पहात आहे. वेतनाच्या हिस्श्यातील घसरण नवउदार धोरणांच्या अंमलाखाली रोजगार संबंधांचे स्वरूप मालकांसाठी जास्तीत जास्त नफा मिळण्याच्या दृष्टीने बदलण्यात आले आहे. कामगारांना वेगवेगळ्या नावांनी कामावर ठेवले जात आहे- कंत्राटी, प्रासंगिक, हंगामी, तात्पुरते, अर्ध वेळ, रोजंदारी, शिकाऊ इत्यादी. त्यांना देय लाभांपासून वंचित ठेवण्यासाठीच सरकार अशी चित्र विचित्र नावं वापरत आहे. खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रात अश्या कामगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अश्या कामगारांमध्ये महिला कामगारांची संख्या खूप मोठी आहे. वेतनाचा खर्च कमी करण्याची मालक वर्गाची एक जागतिक पद्धती आहे अशी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनी (ILO) नोंद घेतली आहे. आयएलओने नोंदले आहे की कामगारांचे वेतन त्यांच्या उत्पादकतेच्या मानाने खूपच मागे पडलेले आहे. भारतात वेतनाच्या हिस्श्यामध्ये कमालीची घसरण नोंदवली गेली आहे- ८०च्या दशकात ३०% वरून ९०च्या दशकात २०% आणि २०१० मध्ये जोडलेल्या निव्वळ मूल्याच्या केवळ ९.४% इतकाच राहिला.

कृषी संकट
कृषी क्षेत्र अजूनही संकटाला तोंड देतच आहे. नवउदार धोरणे राबवण्याची सुरुवात झाल्यापासून कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे कित्येक महिलांसहित २ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीत लागणाऱ्या बियाणे, खते, कीटकनाशके, वीज, पाणी इत्यादी साधनांच्या किंमती सरकारच्या खाजगीकरण आणि शेती क्षेत्रासाठी करावयाच्या खर्चात कपात करण्याच्या धोरणामुळे वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर भाव मिळत नाहीत आणि ग्राहकांसाठी बाजारभाव मात्र वाढत चालले आहेत. व्यापारी, दलाल आणि बहुराष्ट्रीय कोर्पोरेशन्स मात्र सरकारच्या धोरणांमुळे नफा कमावत आहेत. बी, बियाणे आदी शेतीच्या साधनांचा पुरवठा करण्यात बहुराष्ट्रीय कोर्पोरेशन्सची भूमिका वाढत चालली आहे. ते प्रचंड शोषण करणाऱ्या कंत्राटी शेती व्यवस्थेला प्रोत्साहन देत आहेत जी शेतकऱ्यांची जोखीम अजूनच वाढवत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कमी व्याजदराने संस्थात्मक कर्ज उपलब्ध नसल्यामुळे छोटे व मध्यम शेतकरी खाजगी सावकारांच्या जाळ्यात ढकलले जातात. ज्या घरातील पुरुष शेतकरी आत्महत्या करतात त्या घरातील बाईवर कुटुंब आणि शेती दोन्हीची जबाबदारी येऊन पडते. शेतकरी महिलेनी आत्महत्या केल्यास बरेचदा तिच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई पण मिळत नाही कारण बहुतेक वेळा तिच्या नावावर जमीन देखील असत नाही. देशाच्या वेगवेगळ्या भागात तीव्र दुष्काळ आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना पुरेशी मदत द्यायला सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अजूनही चालूच असलेले कृषी संकट आणि शेतीतील घटत जाणारा रोजगार यामुळे महिलांसहित कित्येक कामगारांना कामाच्या शोधात गाव सोडून शहराकडे स्थलांतरित व्हावे लागत आहे. ह्या महिलांना बहुतांश वेळा घर कामगार, बांधकाम किंवा वीट भट्टी कामगार, ऊसतोड कामगार, भाजी किंवा फूल विक्रेती म्हणून काम करावे लागते. त्यांना तीव्र शोषण आणि अनेकदा लैंगिक छळाला बळी पडावे लागते. त्यांना गैरमार्गाने विक्री किंवा देहविक्रय अश्या धोक्यांना सामोरे जावे लागते. सामाजिक दडपशाही महिलांशिवाय समाजात असे दुसरेही विभाग आहेत जसे दलित, आदिवासी आणि मुस्लीम अल्पसंख्याक, ज्यांना आर्थिक शोषणाबरोबरच सामाजिक भेदभाव व दडपशाहीचे दु:ख भोगावे लागते. ह्या विभागातील महिला कामगारांना दुहेरी दडपशाहीला तोंड द्यावे लागते. स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षांहून जास्त वर्षे झाली तरीही अजून देशाच्या अनेक भागांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. दलित महिला मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी, झाडूवाले, चामडे कमावणारे, इत्यादिसारखी कमी वेतनाची आणि तथाकथित ‘अस्वच्छ’ समजली जाणारी कामं करतात. रस्ते बांधणी आणि तत्सम कामांमध्ये दलित आणि आदिवासींना इतरांपेक्षा कमी मजुरी मिळते. सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारच्या खात्यांमध्येदेखील भेदभावाच्या कार्यपद्धती चालू आहेत. अंगणवाडी कर्मचारी,आशा आणि शालेय पोषण आहार कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या दलित आणि आदिवासी महिलांना देशातील अनेक भागांमध्ये अश्या भेदभावांना तोंड द्यावे लागते. मुस्लीम महिला खूप मोठ्या संख्येने घर खेप कामगार (Home based workers) म्हणून विशेषतः बिडी, जरी इत्यादी मध्ये अत्यंत कमी मोबदल्यात काम करतात. ग्रामीण भागातील दलित महिलांना त्यांची जमीन हडपण्याच्या उद्देशाने ‘चेटकीण’ असल्याचा आरोप करून छळ केला जातो व प्रसंगी त्यांना मारून टाकले जाते. सिटूच्या १४व्या अधिवेशनाने आपल्या सर्व कमिट्यांना सामाजिकदृष्ट्या दडपलेल्या विभागांमधील कामगारांना ज्या विशिष्ठ समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांच्याशी दोन हात करण्याची आणि आपल्या युनियनच्या मंचावरून त्यांच्या मागण्या उचलण्याची हाक दिली आहे. आपल्या कामकाजी महिला समन्वय समित्यांनी ह्या विभागांमधील महिला कामगारांच्या विशिष्ठ प्रश्नांना ओळखण्याचा आणि संबंधित युनियन्स आणि सिटू कमिट्यांनी त्यांचे सामाजिक प्रश्नसुद्धा उचलावेत ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संपुआ II सरकार संपुआ II सरकार सामान्य लोकांच्या दु:ख कष्टाशी काही देणेघेणे नाही. एकतर त्यांना आपल्या बहुसंख्य लोकांच्या हितांचे रक्षण करण्याची चिंता नाही किंवा त्यांना आत्मनिर्भर अर्थव्यवस्था निर्माण करण्यात रस तरी नाही. सिटूच्या १४व्या अधिवेशनाने देशात प्रचलित असलेल्या राजकीय, आर्थिक परिस्थितीचा परामर्श घेतला आहे. गेल्या ५ महिन्यात या परिस्थितीत फरक पडलेला नाही. म्हणून त्याचा तपशीलात पुन्हा परामर्श घेण्याची आवश्यकता नाही. सरकारने लोकांवर टाकलेल्या ओझ्यात सातत्याने होणारी वाढ आणि त्यांच्या कामाच्या व जगण्याच्या परिस्थितीत होणारी घसरण ह्यामुळे संपुआ II सरकारबद्दल लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
ह्यादरम्यान काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते, मंत्री, नोकरशहा आणि बडे भांडवलदार इत्यादींच्या भ्रष्टाचारांची एका मागोमाग एक प्रचंड मोठी आणि किळसवाणी प्रकरणे वेगाने बाहेर आली आहेत. त्यातून सत्ताधारी राजकारणी, नोकरशहा आणि भांडवलदारांच्या आंतरराष्ट्रीय वित्त भांडवलाच्या हुकुमाप्रमाणे चालणाऱ्या नवउदार धोरणांच्या अंमलाखालील व्यवस्थात्मक अभद्र युतीचेच प्रत्यक्ष दर्शन होते. ह्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमुळे लोकांच्या क्रोधात अजूनच भर पडली आहे. कामगारांनी तीन प्रचंड मोठे संयुक्त सार्वत्रिक संप आणि असंख्य विभागवार संप व निदर्शने ह्यामधून हा असंतोष आणि क्रोध व्यक्त केला आहे. लोकांनी मनापासून ह्या संपांना पाठींबा दिला व ते मोठ्या संख्येने ह्या देशव्यापी बंदमध्ये सामील झाले. काँग्रेस पक्ष लोकांपासून तुटत चालला आहे. पण लोकांच्या असंतोषाचे आणि क्रोधाचे प्रतिबिंब अजूनही राजकीय रिंगणात पडलेले नाही. भाजपाकडे देखील गरिबांच्या बाजूचे कोणतेही पर्यायी धोरण नाही. कर्नाटकच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे भाजपाचे मागील विक्रम काँग्रेसपेक्षा फार काही वेगळे नाहीत. कामगार आणि सामान्य लोक जेंव्हा त्यांचे अधिकार मिळवण्यासाठी आवाज बुलंद करतात तेंव्हा काँग्रेस आणि भाजपाशासित दोघांच्याही राज्यांमध्ये त्यांना ज्याप्रकारे शासनाच्या दमनाला तोंड द्यावे लागते, त्यात काहीही फरक नाही. त्याव्यतिरिक्त भाजपा जो फासीवादी संघ परिवाराचा सदस्य आहे, त्यांच्या धर्मांध आणि फूट पाडणाऱ्या राजकीय रणनीतीचा अजेंडा पुढे रेटत आहे. त्यांचे मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे आणणे आणि अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा पुन्हा उपस्थित करणे यातून देशासमोर असलेल्या धोक्याची घंटाच जणू ऐकू येत आहे. प्रादेशिक पक्षांनी कधीही नवउदार धोरणांना सातत्याने विरोध केलेला नाही. विरोध करण्याऐवजी उलट त्यांनी अनेकदा संधिसाधू भूमिका घेतली आहे. डावे पक्ष वगळता अन्य कोणत्याही बिगर काँग्रेस पक्षांनी वित्त विषयक संसदीय स्थायी समितीमध्ये पेन्शन विधेयक आणि विमा व बँक विषयक विधेयकाला विरोध केला नाही. निवडणुकीत पैसा आणि गुंडगिरीचा वापर, बड्या राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कोर्पोरेशन्सचा देशाची धोरणे ठरवण्यातील वाढते नियंत्रण काही राजकीय पक्षांचा उघड संधिसाधूपणा ह्या सर्व गोष्टी लोकाशाहीची क्रूर थट्टाच करत आहेत. सिटूच्या १४व्या अधिवेशनाने नोंद घेतली आहे की संपुआ II सरकारच्या राष्ट्राचे हित अमेरिकी साम्राज्यवादाकडे गहाण ठेवण्याच्या धोरणाला फक्त डाव्या पक्षांनीच सातत्याने विरोध केला आहे. मजबूत स्वयंनिर्भर व्यवस्था विकसित करण्याची त्यांनी आग्रहाने मागणी केलेली आहे. ते सरकारच्या जन विरोधी, कामगार विरोधी आणि राष्ट्र विरोधी धोरणांच्या विरोधात संसदेत आणि संसदेबाहेर जोरदार आवाज उठवत आहेत. ते नेहमी लढणाऱ्या कामगारांच्या आणि दडपलेल्या सामाजिक विभागांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले आहेत आणि त्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला आहे. डाव्या पक्षांच्या १ जुलैला झालेल्या संमेलनात मंजूर करण्यात आलेल्या पर्यायी धोरणांच्या ठरावात संयुक्त कामगार संघटना चळवळीने उचललेल्या अनेक मागण्यांचा समावेश आहे. डाव्यांनी नवउदार अजेंड्याला खंबीरपणे केलेल्या मजबूत विरोधाची आणि त्यांच्या लोकांच्या बाजूची धोरणे राबवणाऱ्या सरकारशी असलेल्या बांधिलकीची गळचेपी करण्यासाठी सत्ताधारी वर्ग डाव्यांवर भयंकर हल्ले चढवत आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या ४ वर्षांत शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांची हत्या करण्यात आली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सिटूच्या प्रदीप ता, दिलीप सरकार सारख्या नेत्यांना आपला जीव गमवावा लागला. सिटूच्या हजारो कार्यालयांवर तृणमूलच्या गुंडांनी हल्ले करून ती जाळली किंवा बळकावली. कितीतरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पळवून नेले गेले, त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आले व काहींना तर मारून टाकण्यात आले. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये टीएमसीने प्रचंड मोठ्या हिंसाचाराचे थैमान घातले. डाव्या किंवा अन्य विरोधी पक्षाच्या शेकडो उमेदवारांना त्यांनी एकतर अर्ज तरी भरू दिले नाहीत किंवा प्रचार तरी करू दिला नाही. महिला नेत्या व डावी आघाडी सरकारच्या काही माजी मंत्र्यांसहित विरोधी पक्षाच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर प्रचारादरम्यान शारीरिक हल्ले देखील करण्यात आले. डाव्यांच्या मतदारांवर आणि समर्थकांवर दहशत बसवण्यात आली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत, अगदी मतमोजणीत देखील खोटेपणा करण्यात आला. केरळमध्ये हल्ले प्रामुख्याने खोट्या आणि विखारी प्रचाराच्या रूपाने केले जातात. सत्ताधारी वर्ग कॉर्पोरेट कंपन्यांद्वारा नियंत्रित प्रचार माध्यमांच्या सक्रीय सहकार्याने वैचारिक हल्ले चढवून डावे कसे अप्रासंगिक झाले आहेत हे लोकांना पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व प्रयत्न डाव्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांमध्ये दहशत आणि गोंधळ माजवून डाव्या शक्तींना देशातील राजकीय पटलावरून विशेषतः त्यांच्या बालेकिल्ल्यातून दूर करण्यासाठीच केले जात आहेत. सत्ताधारी वर्गाचे हे दिवास्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. कामगार वर्ग हे कधीही घडू देणार नाही. आपण एका गोष्टीची नोंद घ्यायला हवी की असा अपप्रचार किंवा विरोधकांनी राष्ट्रविरोधी, दहशदवादी आणि विघटनकारी शक्तींशी हातमिळवणी करून देखील त्रिपुरामध्ये डावी आघाडी निर्णायक बहुमत घेऊन, विधानसभेत आपली ताकद वाढवत पुन्हा सत्तेत आली. काँग्रेस आणि भाजपाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही ह्या सत्ताधारी वर्गाने बिंबवलेल्या खोट्या कल्पनेच्या आपण चिंध्या चिंध्या केल्या पाहिजेत. खरा पर्याय म्हणजेच धोरणांचा पर्याय आपण कामगार वर्ग आणि लोकांसमोर जोरदारपणे मांडला पाहिजे. लोकांच्या बाजूच्या पर्यायी धोरणांच्या भोवती मोहिमा आखून लोकांची ताकद एकत्रित करून लढे संघटीत केले पाहिजेत. सध्या राबविल्या जाणारी नवउदार धोरणे अमुलाग्र बदलल्याशिवाय त्यांच्या मूलभूत मागण्या पूर्ण होऊ शकणार नाहीत याबाबत लोकांमध्ये जागृती करणे हे कामगार महिलांसहित कामगार वर्गाचे कर्तव्य आहे. हीच खऱ्या अर्थाने सिटूच्या १४व्या अधिवेशनाने दिलेली हाक आहे. कामगार वर्गाचे लढे गेली ३ वर्षे संयुक्त कामगार संघटना चळवळीच्या मंचावरून सातत्याने झालेल्या मोहिमा आणि लढयांमध्ये कामगार महिलांनी महत्वाची भूमिका बजावली. ह्या दरम्यान तीन मोठे देशव्यापी सार्वत्रिक संप, लोकसभेवर प्रचंड मोर्चा, जेल भरो इत्यादी कार्यक्रम झाले. सर्व क्षेत्रातील कामगार महिला ह्यात मोठ्या संख्येनी सामील झाल्या ज्या एकूण जमलेल्या लोकांच्या ४० ते ५०% होत्या. संयुक्त संघर्षांबरोबरच सिटूने नोव्हेंबर २०१२मध्ये लोकसभेजवळ दोन दिवसीय ऐतिहासिक महापडावाचे आयोजन केले. ज्यात सुमारे दिल्लीच्या थंडीची पर्वा न करता ३५००० योजना कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला, ज्याच्यात प्रचंड मोठी संख्या महिलांची होती. अंगणवाडी कर्मचारी, आशा आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा भरणा जरी यात जास्त असला तरी शासनाने चालवलेल्या, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प शाळा, आयकेपी अनिमेटर्स, संगणक शिक्षक, साक्षर भारती, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना मधील शिक्षक, शिक्षण सेवक, मनरेगा रोजगार सेवक, सहायक एएनएम, लिंक आरोग्य सेविका, शक्ती सहायिका, कृषक साथी इत्यादी १० हून अधिक योजनांमधील कर्मचाऱ्यांनी देखील महापडावात भाग घेतला. भारतीय श्रम परिषदेचे (ILC) चे ४४ व ४५वे सत्र ह्या सर्व मोहिमा व लढ्यांच्या पार्श्वभूमीवर २०१२ मध्ये झालेल्या भारतीय श्रम परिषदेने ४४व्या सत्रात किमान वेतनावर चर्चा करून महत्वाची शिफारस केली. परिषदेने ह्याचा पुनरुच्चार केला की किमान वेतन निश्चित करताना भारतीय श्रम परिषदेच्या १५व्या सत्राच्या शिफारसी आणि राप्टोकास आणि ब्रेट केस मधील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार चलनवाढीचा परिणाम पूर्णपणे निष्प्रभ करण्यासाठी महागाई भत्ता (VDA) समाविष्ट केला पाहिजे. कंत्राटी कामगाराला संबंधित उद्योग, आस्थापनातील नियमित कामगाराइतके वेतन दिले पाहिजे अशी शिफारस भारतीय श्रम परिषदेने केली आहे. अश्याच प्रकारे सिटूने घेतलेली देशव्यापी मोहीम आणि महापडावामुळे योजना कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रकाशझोतात आला. ‘योजना कर्मचारी’ हा कामगार संघटना पडताळणीसाठीचा एक विभाग म्हणून मान्य करण्यात आला. मे २०१३मध्ये झालेल्या भारतीय श्रम परिषदेने ४५व्या सत्रात ‘योजना कर्मचाऱ्यांची’ परिस्थिती हा विषय अजेंड्यावर घेऊन काही महत्वाच्या आणि लक्षणीय शिफारसी केल्या ज्यात कर्मचारी म्हणून मान्यता, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा लाभ आणि त्यांचा संघटना बांधण्याचा आणि सामुहिक वाटाघाटी करण्याचा अधिकार ह्यांचा समावेश होता. परिषदेनी अशी देखील शिफारस केली की त्या त्या संबंधित खात्याने ह्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियमन व सेवाशर्ती निश्चित करण्यासाठी ‘रोजगार स्थायी आदेश’ सूत्रबद्ध करावेत. ह्या सर्व विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे संघटीत करून त्यांच्या ‘योजना कर्मचारी’ म्हणून असलेल्या समान समस्या व मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सिटूने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचेच यश आहे. परंतु सरकारने ह्या शिफारसी अंमलात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचललेली नाहीत. आपल्याला आपले प्रयत्न अजून तीव्र केले पाहिजेत आणि भारतीय श्रम परिषदेच्या ४४व्या व ४५व्या सत्राने केलेल्या शिफारसी सरकारने अंमलात आणाव्या या मागणीसाठीची मोहीम अशीच चालू ठेवली पाहिजे. आपण योजना कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागांना संघटीत करण्यासाठी देखील पुढाकार घेऊन आपले प्रयत्न तीव्र केले पाहिजेत. कामगार वर्गाचा जागतिक लढा युएसए, फ्रांस, जर्मनी, इटाली, इंग्लंड सारख्या पुढारलेल्या भांडवलदारी देशांत आणि स्पेन, ग्रीस इत्यादींसहित जगभरातील अनेक ठिकाणी कामगार वर्गाचे असे लढे होत आहेत. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर त्या त्या सरकारांनी आपापल्या देशात लादलेल्या काटकसरीच्या उपायांना विरोध करत हजारो लोक संप आणि निदर्शनांमध्ये सह्भागी होत आहेत. ग्रीस, पोर्तुगाल आणि स्पेन इत्यादी देशांमध्ये ह्या दरम्यान अनेक वेळा प्रचंड संप झाले आहेत. मुळात ह्या संकटाला कारणीभूत असणाऱ्या बँका व वित्त संस्थांना आर्थिक मदत (बेल आउट) देण्याला आक्षेप घेत लोकांनी भांडवलशाहीचा केंद्रबिंदू असलेल्या न्यूयॉर्कमधील वॉल स्ट्रीट वर मोठ्या संख्येने जमून निदर्शने केली. १%ना लाभ मिळवून देण्यासाठी ९९% लोकांवर ओझे लादण्याच्या विरोधात आवाज उठवला गेला. भाववाढ, बेरोजगारी, कामगारांच्या अधिकारांवर अंकुश ह्या गोष्टी इजिप्त आणि अन्य अरब देशांमधील प्रचंड निदर्शनांसाठी कारणीभूत घटक ठरल्या आणि इजिप्तमध्ये ही निदर्शने तर हुकुमशाही उलथवून टाकण्याच्या दिशेने जाऊ शकली. साम्राज्यशाहीच्या हुकुमानुसार नवउदार धोरणे राबवणाऱ्या सत्तांचे कामगारांवर होणारे वाढते हल्ले आणि ह्या धोरणांना कामगार वर्गाचा जगभरातील वाढता विरोध ह्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या कामाचा आढावा घेतला पाहिजे.

Saturday, September 21, 2013

२५ सप्टेंबर-चलो आझाद मैदान, मुंबई

२५ सप्टेंबर-चलो आझाद मैदान, मुंबई ................२५ सप्टेंबर-चलो आझाद मैदान, मुंबई कामगार संघटना संयुक्त कृती समिती सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स महाराष्ट्र राज्य कमिटी कॉम्रेड्स, कामगार वर्गाच्या लढ्यामधील एका महत्वाच्या टप्प्यावर आज आपण येऊन पोहोचलेले आहोत. २००९ पासून सर्व केंद्रीय कामगार संघटना व सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे, बँक, विमा, गोदी आदी क्षेत्रातील कामगार, कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय फेडरेशन्सनी एकत्र येऊन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून समस्त कामगार वर्गाच्या १० अत्यंत महत्वाच्या आणि मूलभूत मागण्यांवर लढा पुकारला. गेल्या ४ वर्षांत ह्या माध्यमातून देशव्यापी सार्वत्रिक संप, राज्य व राष्ट्रीय पातळीवर शक्ती प्रदर्शन आणि ह्या वर्षाच्या सुरवातीला २०, २१ फेब्रुवारीला तर दोन दिवसांचा सार्वत्रिक संप पुकारून लाखो कामगारांना सातत्याने आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरवले आहे. शासनाच्या जनविरोधी व कामगारविरोधी धोरणांना हाणून पाडण्यासाठीचा आपला निर्धारदेखील कामगारांनी ह्या संघर्षामध्ये सातत्याने दाखवून दिला आहे. फेब्रुवारीतील संपाचा पाठपुरावा म्हणून २३ मे २०१३ रोजी सर्व केंद्रीय कामगार संघटनांचे निवेदन पंतप्रधानांना देण्यात आले परंतु शासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही. ह्यातील कोणत्याही मागणीवर समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. प्रश्न कमी होण्याऐवजी उलट त्यांची तीव्रता वाढतच गेली आहे. सरकारच्या सर्व खात्यांमधील प्रचंड घोटाळे, रुपयाची प्रचंड घसरण, महागाईत वाढ, पेट्रोल डीझेल दरात सातत्याने होणारी वाढ, सार्वत्रिक रेशनची मागणी मान्य न करता मर्यादित लोकांना अपुरी अन्नसुरक्षा देण्याचा केविलवाणा प्रयत्न, पेन्शनच्या नवीन कायद्यामुळे म्हातारपणाचा आधार असलेली आयुष्यभराची जमा रक्कम सट्टेबाजारात झोकली जाऊन नष्ट होण्याचा धोका व रोज नव्या नव्या फसव्या घोषणा ह्याला जनता आता कंटाळली आहे. म्हणून आता पुन्हा एकदा आपण आपले अधिकार मिळवण्यासाठी कंबर कसली पाहिजे. कामगार संघटनांच्या संयुक्त लढ्याच्या मागण्या- 1. सर्वांना कमीत कमी १०,००० रुपये किमान वेतन द्या. 2. सर्व कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करा. 3. सर्व कष्टकऱ्यांना निश्चित पेन्शनची हमी द्या. 4. समान व सारख्या स्वरूपाचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नियमित कामगारांइतकेच वेतन व अन्य लाभ द्या. 5. कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करा. 6. महागाई रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा. 7. रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचला. 8. केंद्रीय व राज्य स्तरीय सार्वजनिक उद्योगांमधील निर्गुंतवणूक थांबवा. 9. बोनस व भविष्य निर्वाह निधीसाठीच्या पात्रतेच्या सर्व कमाल मर्यादा काढून टाका व ग्रॅचुईटीच्या रकमेत वाढ करा. 10. कामगार संघटनांची ४५ दिवसांच्या आत नोंदणी. आयएलओच्या ८७व्या व ९८व्या संमेलनाच्या निर्णयांना मंजुरी द्या. ह्या १० मागण्यांवरील लढा अजून पुढे नेण्यासाठी ६ ऑगस्ट २०१३ला मावळंकर हॉल, दिल्ली येथे कामगारांचे राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले व त्या संमेलनात कामगार संघटनांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले व आपल्या १० मागण्यांवर खालील पंचसूत्री कार्यक्रम एकमताने मंजूर करून त्याची घोषणा केली. 1. २५ सप्टेंबर २०१३- राज्यांच्या राजधानीत राज्य स्तरीय संयुक्त मोर्चा/ निदर्शने/ सत्याग्रह. 2. १२ डिसेंबर २०१३- दिल्ली येथे लोकसभेसमोर शक्ती प्रदर्शन. 3. १२ डिसेंबर २०१३- त्याच दिवशी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 4. पुनर्गठन व आउटसोर्सिंगला प्रभावी विरोध, विशिष्ठ क्षेत्राशी संबंधित प्रश्न/मागण्या, आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधे होणाऱ्या निर्गुंतवणूकीला विरोध यासाठी लढा उभारण्यासाठी त्या त्या विभागात संयुक्त कृती कार्यक्रम. 5. कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन व अन्य मागण्यांसाठी स्वतंत्रपणे संयुक्त कार्यक्रम. वरील घोषणेनुसार सर्वात तातडीचा व काही दिवसांवर आलेला कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबरला आझाद मैदानावर होणारा निदर्शनांचा कार्यक्रम. वर नमूद केलेल्या मागण्यांव्यातिरिक्त राज्य सरकारने कामगार संघटनांचा लढण्याचा व संप करण्याचा अधिकार हिरावून घेण्यासाठी आणलेला अत्यावश्यक सेवा कायदा, घरकामगारांना कामाचे नियमन व पेन्शन देण्यास केलेली टाळाटाळ, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात केलेली दिरंगाई, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी, शिक्षण सेवक, रोजगार सेवक यांना कामगार/कर्मचारी म्हणून मान्यता देण्यास शासनाने केलेली टाळाटाळ हे देखील प्रश्न राज्यामध्ये आपल्या समोर आहेत. आपापल्या क्षेत्रात दिलेल्या स्वतंत्र व संयुक्त लढ्यांना शासनाच्या ह्याच कामगार विरोधी धोरणांमुळे आजपर्यंत फारसे यश मिळू शकलेले नाही. आणि म्हणूनच ह्या प्रश्नांच्या मुळाशी असलेल्या जनविरोधी धोरणांचा मुकाबला आपल्याला सर्व क्षेत्रातील कामगारांबरोबर एकत्रितपणे करायला हवा. सीआयटीयु सर्व कामगारांना आवाहन करीत आहे की ह्या संयुक्त लढ्यात संघटीत, असंघटीत सर्व क्षेत्रातील कामगारांनी मोठ्या संख्येने उतरावे व सरकारची ही जनविरोधी, कामगारविरोधी धोरणे हाणून पाडावी. मोठ्या संख्येने सामील व्हा.

Friday, December 14, 2012

२०/२१ फेब्रुवारी २०१३- देशव्यापी सार्वत्रिक संप

२०/२१ फेब्रुवारी २०१३- देशव्यापी सार्वत्रिक संप देशातील संयुक्त कामगार चळवळ आता एका नवीन टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. सर्व ११ केंद्रीय कामगार संघटनांनी ४ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे एक कामगारांचे एक विशाल संयुक्त संमेलन आयोजित केले होते. ह्या संमेलनातच २०, २१ फेब्रुवारीच्या देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक दिली गेली होती. ह्या संपाला निर्णयाला राज्य व केंद्र सरकारचे सर्व विभाग, बॅंका,विमा, प्रतिरक्षा, दूर संचार आदी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा संघटना, सर्व फेडरेशन आदींनी अनुमोदन दिले आहे. देशातील संपूर्ण श्रमिक वर्गाला एकाच संयुक्त लढ्यात तेही सातत्याने २ दिवसांच्या संपात प्रथमच उतरवणारी स्वातंत्रोत्तर काळातील ही एक ऐतिहासिक कृती ठरेल यात काही शंका नाही. २८ फेब्रुवारी २०१२ रोजी केवळ कामगार वर्गाच्याच नाही तर सर्व सामान्य लोकांच्या हिताच्या ज्या १० सूत्री मागण्यांसाठी एक दिवसीय देशव्यापी संप करण्यात आला. त्याच मागण्यांना पुढे रेटण्यासाठी उचलण्यात आलेले पुढचे हे पाऊल आहे. कष्टकरी वर्गाच्या संघर्षाला पुढे घेऊन जाण्याचा संयुक्त कामगार चळवळीचा निर्धार ह्या पावलात प्रतिबिंबित होणार आहे. सामान्य लोकांच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांसाठी चाललेल्या संघर्षांकडे दुर्लक्ष करून सरकार ज्या कोडगेपणाचे दर्शन घडवीत आहे, त्याला चोख उत्तर देण्यासाठी हा दोन दिवसांच्या संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी उलट सरकारने ज्या प्रकारे हल्लीच डिझेल दरवाढ व gas सिलेंडरच्या अनुदानात कपात करण्याचा व किरकोळ व्यापारात थेट परदेशी गुंतवणूकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यावरून हे सरकार सर्व सामान्य लोकांच्या हाल अपेष्टांबद्दल किती गंभीर आहे हे दिसून आले आहे. जे लोक देशाच्या संपत्तीत भर घालण्यासाठी अहोरात्र कष्ट करतात व सरकाच्या तिजोरीत त्यांना थोडासा दिलासा देण्याऐवजी सरकार ज्या प्रकारे त्यांचा जखमांवर मीठ चोळत आहे त्याचा निषेध करण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. अत्यंत महत्वाची बाब म्हणजे ह्या संघर्षाने वेगवेगळ्या विचारधारेच्या व दृष्टीकोणाच्या संघटनांना कामगार वर्गाच्या व सामान्य जनतेच्या समान मागण्यांवरील संघर्षाच्या देशव्यापी कार्यक्रमामध्ये एकत्र आणलेले आहे. ह्या व्यापक एकजुटीच्या प्रभावामुळे देशातील राज्य व केंद्र सरकारचे सर्व विभाग, बॅंका,विमा, प्रतिरक्षा, दूर संचार आदी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा संघटना व सर्व स्वतंत्र फेडरेशन देखील ह्या संयुक्त लढ्यात सामील झाले आहेत. गेल्या ३ वर्षांत ही एकजूट दिवसेंदिवस अजूनच व्यापक होत चालली आहे. ज्या प्रकारे सरकार जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे व अजूनच आर्थिक बोजा लादत आहे, जनतेच्या रास्त मागण्या मान्य करण्याऐवजी 'पैसे झाडाला लागत नाहीत' अशी बेमुर्वतपणाची उत्तरे देत आहे अश्या पार्श्वभूमीवर हा लढा एका वरच्या टप्प्यावर नेणे ही आवश्यक बनले आहे. कोट्यावधी लोकांच्या मूलभूत गरजा भागवून त्यांना थोडा दिलासा देण्याऐवजी जेव्हा मंत्री महोदय 'पैसे झाडाला लागत नाहीत' अशी उत्तरे देतात तेव्हा त्याना हा प्रश्न विचारायची गरज आहे की 'जेव्हा कॉर्पोरेट घराण्यांना केवळ एकाच वर्षात ५२२ कोटींच्या कर सवलती दिल्या गेल्या तेव्हा काय पैसे ह्यांच्या परसबागेत उगवले होते? काय पंत प्रधान ह्या प्रश्नाचे उत्तर देतील का की २जी, सीडब्ल्यूजी, कृष्णा गोदावरी, कोळसा घोटाळ्यां मध्ये जो पैसा ह्या कॉर्पोरेट घराण्यांनी लुटला तोदेखील ह्यांच्या बागेतल्या झाडांवर लागला होता काय?’ आज संपूर्ण देश ह्या सवालांचा जवाब मागत आहे पण हा जवाब त्यांना आपोआप मिळणार नाही तर एक मजबूत, व्यापक देशव्यापी संघर्ष उभारूनच ह्या प्रश्नांची उत्तरे मिळवावी लागतील. २१,२२ फेब्रुवारी २०१३ ला हीच उत्तरे मिळवण्यासाठी आपण सार्वत्रिक संप करणार आहोत. पूर्ण देश आज एका स्वरात किरकोळ व्यापारात थेट परकीय गुंतवणुकीला विरोध करत असतानाही ह्या सरकारने अगोदर त्याची घोषणा केली. नंतर लोकसभेत मतदान करण्यावरून ताणून धरले आणि त्याच्या वरताण म्हणजे परकीय गुंतवणुकीला विरोध करणाऱ्या सपा, बसपा सारख्या पक्षांना हाताशी धरून त्यांना मतदानावर बहिष्कार घालायला लावून लोकसभेत येन केन प्रकारेण बहुमत मिळवून घेतले. सामान्य जनतेच्या हितापेक्षा सरकारला देशात गुंतवणूक करून ह्या देशातील आम जनतेची लूट करू इच्छिणाऱ्या बहुराष्ट्रीय व्यापारी कंपन्यांचे हितसंबंध जोपासण्यात जास्त रस आहे. म्हणूनच किरकोळ व्यापारात गुंतलेल्या ५ कोटी लोकांचा रोजगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जवळ जवळ २५ कोटी लोकांच्या हितापेक्षा जागतिक व्यापार संघटनेच्या दबावाला बळी पडून परदेशी कंपन्यांना भरघोस नफा मिळवून देण्यातच धन्यता वाटते. ह्याचा जाब विचारण्यासाठी संपूर्ण देशातून आवाज उठला पाहिजे. श्रमिक आंदोलनात आज जी एक व्यापक एकजूट निर्माण झालेली पहायला मिळत आहे ती काही अचानक झालेली नाही. सिटू सहित अनेक कामगार संघटनांनी सरकारच्या घातक नव उदारवादी धोरणांविरुद्ध संघर्ष करण्याच्या हेतूने व्यापक मंच बनविण्यासाठी पावलो पावली जो सातत्याने प्रयत्न केला त्याचीच परिणीती ह्या एकतेत दिसून येत आहे. खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरणाच्या धोरणांच्या दुष्परिणामांमुळे आम श्रमिक जनतेच्या जीवनमान आणि उपजीविकेवर जे भयंकर संकट कोसळले आहे त्यामुळेच ही एकजूट निर्माण झाली आहे व ती तळागाळात प्रत्यक्ष जमिनीच्या स्तरावर जनतेमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे त्याचाच स्वाभाविक परिणाम आहे. अनेक केंद्रीय कामगार संघटना आणि स्वतंत्र फेडरेशनांनी गेले एक दशकापासून अश्या संयुक्त संघर्षांचा अनुभव देखील घेतला आहे. ह्या दरम्यान बॅंका,विमा, प्रतिरक्षा, दूर संचार, कोळसा आदी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी केलेल्या संघर्षांनी देखील कामगार वर्गाच्या व्यापक एकजुटीची संकल्पना विकसित करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. नव-उदार धोरणांची सुरुवात १९९१ मध्ये झाली तेव्हापासून त्यांना विरोध करण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने १३ सार्वत्रिक संप करण्यात आले. तेराव्या संपाच्या वेळेस ही समिती अजून व्यापक झाली व ७ सप्टेंबर २०१० च्या संपात इंटक देखील सामील झाली. २८ फेब्रुवारी च्या चौदाव्या देशव्यापी संपाने एक इतिहास घडवला. त्या संपात बीएमएस व एलपीएफ सहित सर्व ११ केंद्रीय कामगार संघटना ह्यात ह्यात सामील झाल्या. २०, २१ फेब्रुवारी २०१३ च्या २ दिवसीय सार्वत्रिक संपात व्यापक आणि अभूतपूर्व अशी एकजूट दिसून येणार आहे. हा संप कामगार चळवळीला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल यात काही शंका राहिलेली नाही. राष्ट्र्रीय स्तरावर केंद्रीय कामगार संघटना व औद्योगिक फेडरेशनांच्या ऐतिहासिक एकजुटीला अजून मजबूत करून तसेच तळागाळात जमिनी स्तरावर त्याची मुळे बळकट करून श्रमिकांनी यशाकडे वाटचाल केली पाहिजे. संपूर्ण देशात तसेच सर्व क्षेत्रांमध्ये कामाच्या ठिकाणांवर केलेला संयुक्त संघर्ष ही मुळे अजून खोलवर घेऊन जाईल व एकजूट प्रत्यक्ष जमिनीवर भक्कम होईल. आपल्याला संयुक्त मंचाने उचललेले मुद्दे व मागण्यांवर सामान्य श्रमिकांमध्ये वैचारिक एकमत निर्माण करावे लागेल. श्रमिकांच्या समस्या काय आहेत; त्यांची उत्तरे काय आहेत आणि त्या सोडविण्याचा मार्ग कोणता यावर जमिनी स्तरावर सामान्य श्रमिकांमध्ये समान समज निर्माण करणे व वैचारिक समानता आणणे हा सध्याच्या नव उदार वादी धोरणे राबविणाऱ्या सत्तेत बदल घडवून आणण्याचा एकमात्र मार्ग आहे. ह्यातून समस्त कष्टकरी जनतेच्या एकतेचा रस्ता मोकळा होईल व त्यांच्या जागृतीचा स्तर देखील उंचावेल. श्रमिक आंदोलनात सर्व पक्षांची एकजूट असणारा मंच कायम ठेवणे, त्याला अजून व्यापक बनविणे हा संघर्ष पुढे नेण्याचा एकमात्र मार्ग आहे. कामगार वर्गाच्या १० सूत्री मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठीच २०, २१ फेब्रुवारी चा संप होणार आहे. ह्या मागण्या श्रमिकांच्या अश्या समस्या सोडविण्यासाठी आहेत ज्यांच्याविरूद्ध त्यांना आपल्या रोजच्या जीवनात झगडावे लागत आहे. ह्या समस्या श्रमिकांच्या जिवंत राहण्याच्या आणि माणूस म्हणून जगण्याच्या आहेत आणि त्यांचे जगणे उत्तरोत्तर बनलेल्या सरकारांनी सातत्याने घेतलेल्या जनविरोधी आर्थिक धोरणांमुळे केवळ धोक्यातच आले नाही तर नष्ट होण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. संपूर्ण श्रमिक आंदोलनाने १४ सप्टेंबर २००९ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रीय सम्मेलनात ह्या मागण्या निश्चित केल्या होत्या. ७ सप्टेंबर २०११ ला झालेल्या श्रमिकांच्या राष्टीय संमेलनामध्ये ह्या मागण्यांमध्ये अजून विस्तार करण्यात आला. कामगार संघटनांनी श्रामिकाना मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर एकत्र आणून, आंदोलने करून सरकारला ह्या मागण्यांबाबत संवेदनशील बनविण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला. दिवसेंदिवस आपल्या देशातील श्रमिक जनतेच्या कामाच्या व जगण्याची परिस्थिती बिघडत चालली आहे परंतु त्याची सरकारला अजिबात चिंता वाटत नाही.हेच श्रमिक देशाची संपत्ती निर्माण करतात. सरकारच्या तिजोरीत करांच्या माध्यमातून भर घालतात. परंतु त्यांनाच दारिद्र्याचा खाईत व द:ख आणि हालअपेष्टांच्या दलदलीत लोटले जात आहे. श्रमिकांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांच्या सवालांचा जवाब द्यायला सरकारला भाग पाडण्यासाठीच सार्वत्रिक संपाचे आहवान करण्यात आलेले आहे. हे आहवान कष्टकरी जनतेच्या रास्त आणि न्याय्य मागण्या मान्य करवून घेण्यासाठी जो आधीपेक्षाही अजूनच जास्त तीव्र संघर्ष होणार आहे त्यात श्रमिकांना सामील करून घेण्यासाठी करण्यात आले आहे. • पहिली महत्वाची मागणी म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या बेलगामपणे वाढणारया किंमतींवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावी. कामगार संघटनांनी ह्यासाठी स्पष्टपणे काही उपाय सुचविले आहेत. त्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करण्याची तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वायदा बाजारावर पूर्ण प्रतिबंध आणण्याची मागणी केली आहे. निरंतर वाढणारया महागाईवर आळा घालण्यासाठी हा एकमात्र व अनिवार्य उपाय आहे. परंतु सरकार मात्र ही पावले उचलण्यास नकार देत आहे. उलट केंद्रीय अर्थमंत्री दर ३ महिन्यांनी निवेदन देतात की येत्या ३ महिन्यांत महागाई नियंत्रणात येईल मात्र प्रत्यक्षात तो दिवस कधीच उजाडत नाही. गेली ४ वर्षे ते अशी हास्यास्पद वक्तव्ये देत आहेत आणि भूक आणि गरीबीनी त्रस्त लोकांची क्रूर चेष्टा करत आहेत. ह्या चेष्टेचे एक टोक म्हणजे २०११च्या डिसेंबरमध्ये त्यांनी दिलेले वक्तव्य. लोकसभेत महागाईवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे उदगार काढले की जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारातील किंमती आता कमी झालेल्या आहेत! हे त्यांनी कशाच्या आधारावर म्हटले? त्यांच्या स्वत:च्याच दर निरीक्षण कक्षानी दिलेल्या अंदाजांनुसार काही वस्तूचे भाव पुढीलप्रमाणे वाढलेले दाखवले आहेत- चणा डाळ- १००%, तूर डाळ- १८%, मसूर डाळ- २०%, साखर- ३३%, दूध- २५%, मोहरीचे तेल- ५०%, वनस्पती- ३०%, चहा- ३५% आणि मीठ- ३३%. हे सर्व सरकारी अंदाज आहेत. किरकोळ बाजारातील प्रत्यक्ष दरवाढ मात्र त्याहीपेक्षा जास्त भयावह आहे. वस्तूंचे दर कमी झाल्याचा साराकारचा दावा हास्यास्पद आहे तेही अश्या वेळी जेव्हा स्वत: पंतप्रधानांना अर्थमंत्र्यांना वारंवार चलनवाढीच्या दराबाबत बोलावे लागले. एका बाजूला काही मंत्री दरवाढ कमी झाल्याचा दावा माध्यमांसमोर करतात तर त्याच वेळेला काही अन्य मंत्री व पंतप्रधान मात्र असा तर्क देत आहेत की शेतकरयांना दिलेल्या हमी भावामुळे अन्नधान्याच्या किंमती वाढल्या आहेत. काही तर असे वक्तव्य देत आहेत की लोकांकडे जास्त पैसे आल्यामुळे ते जास्त खरेदी करत आहेत म्हणून भाव वाढत आहेत! महागाईने आम जनतेचे कंबरडे मोडलेले असताना अशी विवादास्पद वक्तव्ये करणे म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे. शेतकरयांना दिलेल्या हमी भावामुळे भाववाढ हा दावा आकड्यांनिशी सिद्ध करता येईल. जेव्हा सरकारने गव्हाचा हमी भाव ११२० जाहीर केला तेव्हा त्याच गव्हाचे खुल्या बाजारातील दर २० रुपयांच्या खाली नव्हते. तूर व उडद डाळीचा हमी भाव जेव्हा रु. ३० जाहीर झाला तेव्हा त्याच डाळीचा किरकोळ बाजारातील दर ६० ते १०० होता. साठवण व दळणवळणाचा खर्च धरूनही दर खरे तर इतके जास्त असता कामा नयेत. ह्याचा अर्थ हाच आहे की दरवाढीचे खरे कारण लपवण्यासाठीच सरकार हे फसवे कारण देत आहे. उत्पन्न वाढल्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढली व पर्यायाने दरवाढ झाली हा तर्कही तेवढाच खोडसाळपणाचा आहे. हा दावा किती खोटा आणि फसवा आहे ते श्रमिकां व्यतिरिक्त अजून कोणाला जास्त चांगले अवगत आहे? प्रगती झाल्यामुळे सकल उत्त्पन्न जरी वाढले असले तरी हे उत्त्पन्न वाढवण्यात ज्यांच्या श्रमाचा मोठा वाटा आहे, त्यांना मात्र त्या वाढलेल्या उत्पन्नात फारसा वाटा मिळालेला नाही. हे वाढलेले उत्त्पन्न देशी विदेशी बडी औद्योगिक घराणी व कंपन्याच सरकारी संरक्षणाखाली लुटून नेत आहेत. देशाचे उत्त्पन्न वाढत आहे पण त्याच वेळेला कायम कामगारांची संख्या मात्र दिवसेंदिवस घटत आहे आणि अश्या कंत्राटी कामगारांची संख्या वाढत आहे ज्यांना अत्यंत कमी मोबदल्यावर राबवून घेतले जात आहे. सकाळ उत्पन्नातील वेतनाचा हिस्सा घटत आहे तर नफ्याचा वाटा मात्र प्रमाणाबाहेर वाढत चालला आहे. लोकांचे उत्त्पन्न वाढल्यामुळे मागणी वाढली व त्यामुळे दरवाढ होत आहे हा पंतप्रधानांचा दावा संपूर्णपणे खोटा आहे. सरकारे आकड्यावरून उलट हे दिसून येत आहे की लोकांच्या स्वत:च्या खाजगी वापरासाठीच्या वस्तूंच्या खरेदीच्या वाढीचा दर २००५-०६ मध्ये ८.६% होता तो २०१०-११ मध्ये घटून ७.३% झाला. लोकसंख्येत वाढ होऊनही घरगुती वापराच्या वस्तूंवरील खर्चाचे प्रमाण मात्र घटले आहे. सामान्य जनता आणि कामगारांवर कामगारांवर दुहेरी मार पडत आहे. एका बाजूला त्यांची कमाई घटत आहे तर दुसरीकडे महागाई मात्र प्रचंड प्रमाणात वाढत आहे. इतकी साधी सरळ गोष्ट ह्या सरकारला कळत नाही की सरकार गरिबांच्या हालअपेष्टांच्या बाबतीत असंवेदनशील झाले आहे? जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीचे कारण काय आहे? मोठ्या व्यावसायिकांना जास्त नफा मिळवून देण्यासाठीच ही मूल्यवृद्धी किंवा महागाई केली जात आहे. ह्याचा खरा दोषी आहे सरकार आणि मोठ्या व्यावसायिकांची अभद्र युती. अन्नधान्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की अन्नधान्याच्या उद्पादकांना म्हणजे शेतकरयांना त्यांच्या शेतमालाला योग्य दाम मिळत आहेत. सरकार शेतमालाला हमी भाव देत असल्याबद्दल खूप गाजावाजा करत असले तरी प्रत्यक्षात मात्र शेती परवडत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत किंवा आपले पीक पेटवून टाकत आहेत. देशातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी नाईलाजाने शेती सोडून देण्याचा किंवा जमीन पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे कारण त्याना उत्पादन खर्च भरून निघण्याएवढे दाम मिळत नाहीत. अश्या परिस्थितीत मग वाढलेल्या किंमतीमधला मलिदा कुणी खाल्ला माननीय पंतप्रधान साहेब? . गेली ३,४ वर्षे जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत व ते वाढण्यासाठी सरकारची धोरणेच जबाबदार आहेत हे स्पष्ट दिसून आले आहे. सरकार एका बाजूला सार्वजनिक वितरण व्यवस्था जाणून बुजून कमजोर व खिळखिळी बनवत आहे तर दुसऱ्या बाजूला मोठा व्यावसायिक घराण्यांना ह्या क्षेत्रात भरमसाठ नफा कमावण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणारी व सक्रीय संरक्षण देणारी धोरणे अवलंबित आहे. बाजारात अन्नधान्याचे भाव वाढत असताना सरकार मात्र बेशरमपणे शासकीय गोदामांमध्ये ६०० लाख टन धान्यसाठा वितरीत करण्याऐवजी तसाच तसाच साठवून ठेवत आहे. आणि हा साठा बाहेर आणायचाच असल्यास तो रेशन दुकानांमधून स्वस्त भावात देण्याऐवजी खुल्या बाजारात आणून बड्या व्यापाऱ्यांना ते स्वत:च्या खाजगी गोदामांमध्ये हलवून साठेबाजी व नफेखोरी करण्याची संधी देते. खरे तर वाढती महागाई हा सरकार व बड्या व्यापारी कंपन्या यांचा भागीदारीतील धंदाच बनला आहे ज्याच्यामुळे बड्या व्यापारी घराण्यांना लोकांच्या भुकेचे भांडवल करून साठेबाजी, सट्टेबाजी आणि छप्परफाड नफेखोरी करणे सहज शक्य होत आहे. एवढेच नाही तर सरकारने सातत्याने केलेल्या डीझेल पेट्रोल व वीज दरवाढीने देखील ही महागाई वाढविण्यामध्ये एक खलनायकाची भूमिका वठवलेली आहे. ह्या दर वाढीमुळे महागाईचा आलेख सतत चढता ठेवून सट्टेबाजाराला उत्तेजन दिले आहे. काही राज्यांचा अपवाद वगळता संपूर्ण देशात रेशन व्यवस्थेचा बोजवारा उडवण्यामध्ये सरकारच्या धोरणांचा मोठा 'हात' आहे. हास्यास्पद दारिद्र्य रेषा बनवून गरिबांना स्वस्त धान्य मिळण्याच्या घेऱ्याच्या बाहेर ठेवण्याचे कारस्थान करून सरकारच गरिबांच्या जिवाशी खेळत आहे जेणेकरून देशी विदेशी बड्या व्यापारी कंपन्यांना धान्य बाजारात उतरण्याची व सुपर नफा कमाविण्याची संधी मिळवता येईल. पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती नियंत्रण मुक्त करून सरकारने जणू आगीत तेलच ओतले आहे. शिवाय वीजदर वाढ, युरियाचा भाव दुपटीने वाढवणे ही पावले आधीच उचलली आहेत तर डीझेल,स्वयंपाकाच्या gasचे विनियंत्रण करण्याचा निर्णय देखील होऊ घातला आहे. आतातर शेतकऱ्यांना योग्य दाम आणि ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू देण्याच्या निमित्ताने किरकोळ बाजारात थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देऊन आणि लोकसभा,राज्यसभेत येन केन प्रकारेण त्यावर बहुमत गोळा करून जनतेला विदेशी मोठ्या व्यापारी कंपन्यांच्या ताब्यात देण्याचे घातक पाऊल सरकारने उचलले आहे. लोकसभेत सादर झालेल्या अन्न सुरक्षा विधेयकाने तर सर्व जनतेला सार्वजनिक वितरण व्यवस्था लागू करण्या ऐवजी गरीबांमध्ये प्राधान्यक्रमाचे व सामान्य अशी विभागणी करून बहुसंख्य गरिबांची अन्नसुरक्षा धोक्यात आणली आहे. येऊ घातलेली आधार कार्डाला जोडलेली रोख हस्तांतरण योजना तर रेशन व्यवस्थेला पूर्णपणे उध्वस्तच करणार आहे. . नव उदारीकरणाच्या धोरणांचा खरा चेहरा हाच आहे ज्याच्या आधारावर हे कॉर्पोरेट घराण्यांना बांधील सरकार चाललेले आहे. हा वित्त भांडवलाच्या वर्चस्वाच्या खऱ्या चेहऱ्याला देखील प्रतिबिंबित करतो ज्याच्यामुळे आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. ह्या विकृतीची एक बाजू व्यवस्थात्मक भ्रष्टाचार देखील आहे. बाजारभाव वाढवत नेणे ही ह्या अर्थव्यवस्थेची मीमांसक चालक शक्ती आहे आणि कॉर्पोरेट लूट कायदेशीर बनवणे हा त्या गुन्ह्याचा दुसरा चेहरा आहे ज्याचे पर्यायी नाव 'नव उदारीकरण' आहे. • कामगार संघटनांनी उचललेली दुसरी मोठी मागणी आहे रोजगाराच्या सुरक्षेची. सर्व श्रमिकांना रोजगाराची सुरक्षा द्या. सरकार जागतिक आर्थिक संकटाच्या दुष्परीणामांच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी खाजगी व्यावसायिकांना व औद्योगिक घराण्यांना लाखो करोडो रुपयांच्या सवलती व बेल आउट ची गाठोडी देत आहे. कामगार संघटनांची मागणी आहे की ह्या बेल आउट सोबत कामगारांचा रोजगार सुरक्षित ठेवण्याची अट देखील जोडली गेली पाहिजे. ह्याचा अर्थ हा की सरकारच्या तिजोरीतून ही मोठी औद्योगिक घराणी बेल आउटच्या नावाखाली जो पैसा लुटत आहेत त्याचा उपयोग कामगार कपात करण्यासाठी करता कामा नये. हा पैसा कोणा मंत्र्याच्या खिशातून नाही तर जनतेच्या करांमधून गोळा झालेल्या पैश्यांतून दिलेला असतो. ज्या संकटातून तरण्यासाठी तो दिला जातो, त्याच संकटाच्या नावाखाली भांडवलदारांनी कामगार कपात करत असतील तर मग त्यांना उदार हातांनी पैसा द्यायचाच कशासाठी? सरकारने आर्थिक संकटांच्या पार्श्वभूमीवर २००९-१० मध्ये बेल आउटच्या नावाखाली १,८६,००० कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली गेली तर ४ लाख कोटी रुपयांच्या कर सवलती दिल्या गेल्या ज्याचा वार्षिक अर्थ संकल्पात 'राजस्व हानी' असा उल्लेख केला गेला आहे. एवढं करूनही त्याच वर्षी केवळ निर्यातोन्मुख उद्योगांमध्येच ५० लाखाहून अधिक कामगारांचा रोजगार हिरावून घेतला गेला. जागतिक आर्थिक संकट कोसळलेल्या २००९-१० ह्या वर्षभरात कॉर्पोरेट घराण्याच्या नफ्यात ३०% वाढ झाली त्याच वर्षी मंदीच्या नावाखाली ५० लाख कामगारांची रोजीरोटी मात्र नष्ट केली गेली. कॉर्पोरेट घराण्यांना मोठ मोठ्या सवलती तर दिल्या गेल्या परंतु रोजगार निर्माण करण्यात त्यांचे योगदान खरोखर किती आहे याबद्दल मात्र शंकाच आहे. सवलतींचे प्रमाण दर वर्षी वाढतच जात आहे पण रोजगार निर्मितीचा दर मात्र कमी कमी होत चालला आहे हे रोजगार विहीन आर्थिक विकासाचेच द्योतक आहे. राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण (६६वे चक्र) च्या आकडेवारीनुसार रोजगार वाढीचा दर २०००-०५ मधल्या २.७% वरून २०००५-१० मध्ये केवळ ०.८% इतकाच उरला. बिगर शेती क्षेत्रातील रोजगार वाढीचा दर तर त्याच कालावधीत ४.६५% वरून घटून केवळ २.५३% झाला. परंतु त्याचवेळेला सकल देशांतर्गत उत्त्पादन वाढीचा दर मात्र ८% होता. सरकारच्या तिजोरीत सर्व सामान्य लोकांच्या कष्टाच्या पैश्यांची सतत भर पडत असते. कॉर्पोरेट क्षेत्रातील घराणी मात्र जेवढा कर भारतात त्यापेक्षा जास्त पैसा सवलतींच्या रूपाने लुटून नेतात. ह्याशिवाय करांच्या नियमांमधील पळवाटांचा वापर करून ते कर बुडवतात ती गोष्ट तर वेगळीच. सरकार मात्र थकबाकी वसूल करण्याऐवजी त्यांना अजूनच सूट जाहीर करते. ही वसूल न होणारी थकबाकीची रक्कमच बेल आउट च्या १,८६,००० कोटी रकमेच्या ६ पट आहे. कामगार संघटनांनी सरकार- कॉर्पोरेट क्षेत्राच्या ह्या युतीने देशाच्या अर्थव्यवस्थेची व श्रमिक वर्गाची जी निर्मम लूट चालवली आहे तिचा सातत्याने विरोध केला आहे. • संयुक्त श्रमिक आंदोलनाची तिसरी महत्वाची मागणी आहे कोणताही अपवाद न करता सर्व मूलभूत कामगार कायद्यांची काटेकोरपणे व कडक अंमलबजावणी करा आणि त्यांचे उल्लंघन करणारयांना कडक शासन करा. कायद्यांचे पालन करवून घेणाऱ्या यंत्रणेशी संगनमत करून मालक वर्ग कामगार कायद्यांची सरासर पायमल्ली करतो. हे मालकवर्गाचे नफे वाढवण्याचे एक हत्यार आहे. जेव्हा जेव्हा मालक वर्गाला नफा वाढवायचा असतो तेव्हा तेव्हा तो आपल्या हल्याचे पहिले लक्ष्य श्रमिक आणि केवळ श्रमिकांनाच बनवत असतो. हे कामगार कायदे श्रमिकांना मालक वर्गाकडून भीक म्हणून मिळालेले नाहीत तर अनेक दशकांपासून सातत्याने होत असलेल्या श्रमिक आंदोलनाने त्यातील एक एक कायदा लढून मिळवला आहे मग तो ८ तासांच्या कामाचा कायदा असो कि किमान वेतन कायदा. ८ तासांच्या कामाच्या लढ्याचे प्रतीक म्हणून आजही आपण १ मे कामगार दिवस म्हणून साजरा करत असतो. परंतु आज मात्र १२, १२ तास जबरदस्तीने काम करवून घेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. सामान्य माणसाने एखादा कायदा मोडला तर प्रशासन त्याच्यामागे हात धुवून लागत असते पण कामगार कायदे मोडणाऱ्या भांडवलदारांना मात्र अश्या प्रकारच्या कारवाईतून पूर्ण सूट मिळत असते. कामगार कायद्याच्या अंमलबजावणी साठी लढणाऱ्या कामगारांना शिक्षा दिली जाते पण ते मोडणाऱ्या मालकांना मात्र रान मोकळे करून दिले जाते. खरे पाहता कामाच्या ठिकाणी होणारे देशातील ९० % विवाद कामगार कायद्यांचे उल्लंघन झाल्यामुळे उभे राहिलेले असतात. मालक वर्ग सरकार आणि कामगार खात्याच्या प्रशासनाच्या संगनमताने कामगारांविरुद्ध टोळी बनवून मूलभूत कामगार कायद्यांची पायमल्ली करतो व कामगारांची लूट करतो. त्यांना किमान वेतन देत नाही वर निर्धारित ८ तासांच्या पेक्षा जास्त काम करून घेतो. कामाच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसते. त्यांना कोणतीच सामाजिक सुरक्षा व सुविधा दिल्या जात नाहीत. म्हणूनच कामगार संघटनांनी संयुक्तपणे ही मागणी केली आहे की सर्व कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे व त्यांचे उल्लंघन करणारयांवर कडक कारवाई झाली पाहिजे. • कामगार संघटनांची चौथी मागणी ही आहे, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा प्रदान करा. देशातील ९३ %हून अधिक श्रमशक्ती असंघटीत क्षेत्रात काम करते, ज्यांना प्रत्यक्ष व्यवहारात बहुतांश कामगार कायद्यांच्या घेऱ्याबाहेर ठेवले जाते. ना कामांच्या तासांचे निर्धारण, ना किमान वेतन आणि ना सामाजिक सुरक्षा. त्याहून वाईट म्हणजे रोजगाराला संरक्षण तर अजिबातच नाही. देशाच्या उत्पन्नात त्यांचा ६० ते ६५ % वाटा आहे आणि जागतिकीकरणाच्या काळात ही संख्या वाढतच चालली आहे. जागतिकीकरणाच्या काळात त्यांची संख्या वाढतच चालली आहे आणि त्याच वेळी आपल्या अर्थव्यवस्थेत नियमित आणि कायम कामगारांची संख्या मात्र घटत चालली आहे. श्रमिक आंदोलनाच्या दबावामुळे २००८ साली केंद्र सरकारने शेवटी असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांसाठी एक सामाजिक सुरक्षा कायदा बनवला. त्यांच्या कामाचे नियमन, कामाची सुरक्षा, कामगार कायद्यांचे संरक्षण व सामाजिक सुरक्षा आदी लागू करण्यासाठी हा दबाव आणला गेला होता परंतु प्रत्यक्षात मात्र ह्या कायद्याने भ्रम निर्माण करण्याव्यतिरिक्त काहीच दिलेले नाही. ह्या कायद्यामुळे असंघटीत क्षेत्रात अत्यंत असुरक्षित अवस्थेत श्रम करणाऱ्या सर्व श्रमिकांना व्यापक सामाजिक सुरक्षा प्रदान करणे अपेक्षित होते पण सरकारने ज्या १० थातूर मातुर योजना जाहीर केल्या आहेत त्यादेखील फक्त 'दारिद्र्यरेषे खालील' कामगारांसाठी जाहीर केल्या आहेत. म्हणजेच सार्वत्रिक सुरक्षा देण्याऐवजी सरकारने पुन्हा एकदा श्रमिकांमध्ये पाचर ठोकून ठेवली आहे. आणि बहुसंख्य खऱ्या गरजू कष्टकरयांना सुरक्षेच्या घेऱ्याबाहेरच ठेवण्याचे कारस्थान केले आहे. त्यामध्ये रिक्षा चालवणारे, बिडी वळणारे, वीटभट्ट्या, हातमागावर काम करणारे असे अनेक कमी मोबदल्यात अत्यंत कष्टाचे काम करणारे कामगार देखील वंचित राहणार आहेत. युपीए १ ने असंघटित क्षेत्रातील उद्योगांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन केला होता. ह्या आयोगानी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा कोष बनवण्याची व तो सर्व ठिकाणी लागू करण्याची तसेच त्या माध्यमातून पेन्शन, अपघात व आयुर्विमा, आरोग्य विमा व प्रसूती लाभ सार्वत्रिक पातळीवर सर्व असंघटीत क्षेत्र कामगारांना लागू करण्याची शिफारस केली होती. त्यांनी असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामागारांसाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा बोर्डाचे गठन करण्याची व केंद्रीय अर्थसंकल्पामधून पुरेश्या निधीची व्यवस्था करण्याची देखील शिफारस केली होती. परंतु केंद्र सरकारने ह्या बाबतीत कोणतीही ठोस पावले अद्याप उचललेली नाहीत. २०१०-११ मध्ये संपूर्ण देशातील जवळ जवळ ४५ कोटी लोकांसाठी १००० कोटींची मामुली रक्कम मंजूर केली पण त्या रकमेचा कसा विनियोग झाला हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. असंघटीत कामगारांसाठी योजना राबवीत असल्याचा सरकारचा दावा किती पोकळ आहे हे राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजनेच्या आकडेवारीवरूनच स्पष्ट होते. दारिद्र्य रेषेखालील व थोडे वर असलेल्यांसाठी ही योजना लागू आहे. ह्या योजनेचे मोठा डांगोरा पिटला गेला. व २ कोटी लोकांनी त्याचे स्मार्त कार्ड काढले असल्याची माहिती ज्ञात आहे. सरकारचा इरादा ह्या देशातील सर्व ६.५२ कोटी दारिद्र्य रेषेखालील लोकांना ह्या योजनेअंतर्गत आणण्याचा आहे व त्यासाठी वार्षिक हप्त्याचा ७५% भाग देण्यासाठी सरकारला ४,८७५ कोटी रुपयांची गरज आहे. परंतु सरकारने वार्षिक अर्थसंकल्पात जी तरतूद केली आहे त्यात महागाई व बेरोजगारीमुळे दिवसें दिवस वाढत जाणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या १% लोकांना देखील ह्याचा लाभ ते देऊ शकणार नाहीत हे स्पष्ट आहे. ह्या व्यतिरिक्त पेन्शनच्या नावाखाली सरकारने जी असंगठीत क्षेत्रातील कामागारांसाठी 'स्वावलंबन' नावाची योजना आणली आहे ती तर शुद्ध फसवणूक आहे कारण त्यात सरकारचे फारच मर्यादित अंशदान आहे. कामगारांच्या अंशदानातून चालणाऱ्या ह्या योजनेत पेन्शनच्या रकमेबाबत कोणतीही निश्चिती नाही कारण कामगारांच्या कष्टाचा पैसा सरकार सट्टाबाजारात ओतणार आहे जो वाढूही शकतो आणि शून्यावर देखील येऊ शकतो. वरील उदाहरणं सामाजिक सुरक्षेच्या नावाखाली असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या सरकारने केलेल्या फसवणूकीचे चित्र स्पष्ट करत आहे. हा नव उदारीकराणाच्या सत्तेद्वारा चाललेल्या लुटीचा अविभाज्य भाग आहे. देशाच्या कष्टकरी जनतेच्या म्हातारपणाची ही क्रूर चेष्टाच नाही काय? कामगार संघटनांची एकमुखाने ही मागणी आहे की सर्व असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा कवच देण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा बोर्डाच्या शिफारसीप्रमाणे राष्ट्रीय कोष बनवावा ज्यात सरकारने भरीव अर्थसंकल्पीय तरतूद करावी. • केंद्रीय कामगार संघटनांची पाचवी महत्वाची मागणी आहे की सरकारने केंद्रीय व राज्य पातळीवरील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांतील निर्गुंतवणूकीचे धोरण मागे घ्यावे. सरकारने ह्यापूर्वीच सार्वजनिक उद्योगांमधील युनिट्सचे भाग बाजारात आणायला सुरवात केली आहे. ह्या शेअर विक्रीचा स्तर आता धोकादायक पातळी पर्यंत पोहोचला आहे. ओ एन जी सी, एन टी पी सी, आर सी एफ, कोल इंडिया आदी नवरत्न कंपन्यांचे शेअर विकून सरकारने पहिल्या टप्प्यात २०,००० कोटी रुपये जमा केले. आता दुसऱ्या टप्प्यात ४०,००० कोटी रुपयांचे शेअर विकण्याचे सरकारचे महत्वाकांक्षी नियोजन आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आता बी एच ई एल, एच ई एल, नाल्को अश्या नवरत्न कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करण्याचा घाट सरकारने घातला आहे. सरकार अतिशय आक्रमकपणे पुढे जात आहे. फायद्यात चालणाऱ्या अती महत्वाच्या व मूलभूत क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील निर्गुंतवणूक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून टप्प्या टप्प्याने खाजगीकरणाच्या दिशेने जाणारे छुपे पाऊल आहे असे श्रमिक आंदोलन मानते. हे पाऊल देशी विदेशी खाजगी भांडवलदारांच्याच फायद्यासाठी उचललेले आहे. अश्या तऱ्हेने सरकार आपल्या देशातील विशाल सार्वजनिक संपत्ती व नैसर्गिक साधन संपत्ती खाजगी मालकांच्या हातात देऊ इच्छित आहे यात काही शंकाच नाही. सरकारची ही कारवाई जनविरोधी व राष्ट्रविरोधी असून जनहित व देशहिताच्या दृष्टीने ह्या घातक कारवाईला कडाडून विरोध केला पाहिजे. सध्याचे सरकार हा भ्रामक तर्क देत आहे की निर्गुंतवणूकीचा अर्थ आहे जनतेच्या मालकीचा विस्तार करणे; सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मालकी ह्यातून दृढ होईल; मिळालेल्या निधीमधून अजून कल्याणकारी योजनाचा लाभ जनतेला मिळवून देता येईल इत्यादी! हादेखील तर्क दिला जातो की अगदी अल्प प्रमाणात शेअर विकल्यामुळे कोणत्याही प्रकारे खाजगीकरणाचा धोका संभवत नाही. सरकारचे हे सर्व तर्क म्हणजे शुद्ध खोटेपणा आहे आणि सरकार लोकांना मूर्ख बनवण्यासाठी ह्या भूलथापांचा व्यापक प्रचार करण्यात मग्न आहे. जनतेच्या मालकीचा विस्तार हा सरळ सरळ फसवा तर्क आहे. खरे पाहता सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या सरकारच्या म्हणजे १००% लोकांच्याच मालकीच्या असताना खाजगी लोकांना त्याचे शेअर विकून त्यांच्या मालकीचे उलट खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरण होण्याचाच धोका आहे. खाजगी कॉर्पोरेट महारथी कंपन्यांना ह्या निमित्ताने सार्वजनिक संपत्तीवर डल्ला मारण्याची संधी मिळणार आहे. ह्या प्रक्रियेत मुश्किलीने १ ते १.५ % शेअर कर्मचारी किंवा अन्य सामान्य खाजगी व्यक्तींकडे गेले आहेत. अन्य शेअर मोठ्या प्रमाणात शेअर देशी, विदेशी कॉर्पोरेट घराणी व भांडवलदारांनीच ताब्यात घेतले आहेत. ज्याच्यात बहु राष्टीय कंपन्या व म्युच्युअल फंड सामील आहेत. आधुनिकीकरणासाठी निर्गुंतवणूक करण्याची अजिबात गरज नाही कारण सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे स्वत:ची साधन संपत्ती व ५ कोटी रुपयांचा राखीव निधी देखील असतो ज्याचा वापर ते करू शकतात. त्यांना त्यासाठी बॅंकांकडून कर्ज घेण्याची सोय देखील उपलब्ध आहे व त्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी साधने आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात निर्गुंतवणूक करून लोक कल्याणकारी योजनांसाठी निधी उभारण्याचा जो तर्क दिला जातो तो अजिबात खरा नाही. लोकांनी निवडलेल्या सरकारची जबाबदारी आहे लोकांच्या कल्याणासाठी योजना बनवणे व त्यासाठी निधी जमवणे. आपल्या नियमित खर्चातूनच ह्याचे प्रावधान झाले पाहिजे. त्यासाठी हे घातक पाऊल उचलणे केवळ आणि केवळ खाजगीकरणाच्या उद्देशानेच होत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील श्रमिक आंदोलन अगोदरच ह्या खाजगीकरणाविरुद्ध सातत्याने लढा देत आलेला आहे. देशभरातील कोळसा श्रमिकांनी गेल्या वर्षी लढाऊ संप केला होता. कोल इंडियाने हा संप होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. कर्मचारयांना स्वस्तात शेअर देण्याचे प्रलोभन देखील देण्यात आले परंतु श्रमिक त्यांच्या कारस्थानाला बळी पडले नाहीत. त्या श्रमशक्तीचा १% भाग देखील शेअर विकत घेण्यासाठी पुढे आला नाही. . राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड चे कामगार व अन्य कामगार संघटनांनी २०१२च्या जुलै महिन्यात जबरदस्त लढाऊ संप केला व १२,१३ ऑक्टोबरला पुन्हा एकदा ते जेव्हा संपात उतरले तेव्हा संपूर्ण विशाखापट्टणं शहारातील लोकांनी कामगारांच्या लढ्याला पाठींबा देण्यासाठी आम हडताल करून पूर्ण शहर बंद केले. ओडीशातील नाल्को कंपनीत निर्गुंतवणुकीची कारवाई करण्याच्या सरकारच्या प्रस्तावा विरुद्ध २० ऑक्टोबर २०१२ रोजी कामगारांनी संप केला, जो १००% यशस्वी झाला. आता कामगारांनी राज्यव्यापी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे व त्याची तयारी सुरु केली आहे. आता कामगारांनी राज्यव्यापी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे व त्याची तयारी सुरु केली आहे. निर्गुंतवणुकीच्या विरोधातील ह्या लढ्याला सार्वजनिक उद्योगातील अन्य युनिट्स मधील कामगार संघटनांनी देखील सक्रीय पाठींबा दिला आहे. नव उदारीकरणाच्या आर्थिक धोरणांची सत्ता वेगवेगळ्या मार्गांनी खाजगीकरण आणायचा प्रयत्न करीत आहे. निर्गुंतवणूक हा त्यातलाच एक प्रकार आहे. अर्थव्यवस्थेतील वित्त क्षेत्राच्या निर्गुंतवणुकीच्या धोरणांना संसदेत येऊ घातलेल्या बँकिंग कायदा (दुरुस्ती) विधेयक व विमा कायदा (दुरुस्ती) विधेयकांच्या माध्यमातून लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ह्याचे अंतिम उद्दिष्ट आहे विदेशी वित्त कंपन्यांच्या फायद्यासाठी संपूर्ण बँकिंग व विमा क्षेत्राचे खाजगीकरण करणे ज्यात आपल्या देशातील खाजगी भांडवलदार त्यांचे दुय्यम भागीदार असतील. कोल गेट सारखा मोठा घोटाळा उघडकीला येऊन देखील ह्या घोटाळ्यांचा फायदा घेणारयांनी हार मानली नाही. आता तर ते खुल्या स्पर्धात्मक लिलावांच्या माध्यमातून राष्ट्रीयकरण समाप्त करून संपूर्ण कोळसा क्षेत्राचे खाजगीकरण करण्याची मागणी करत आहेत. खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांची भागीदारी (पी पी पी) ह्या नावाखाली मूल्यवान नैसर्गिक साधन संपत्ती, सार्वजनिक उपयोगाच्या सेवा, रस्ते, रेल्वे स्टेशन्स, विमानतळ यासारखी महत्वाची मूलभूत अंतर्गत साधने खाजगी कंपन्यांच्या खिशात घातली जात आहेत जेणेकरून जनतेवर मोठा बोजा लादून त्यांना प्रचंड नफा कमावता यावा. इतकेच नाही तर ह्या कारस्थानातून शिक्षण आदी कल्याणकारी योजना देखील सुटलेल्या नाहीत त्या सुद्धा ह्या खाजगी व्यावसायिकांच्या भक्ष स्थानी पडत आहेत. ह्याचे संपूर्ण 'श्रेय' अर्थातच पंत प्रधान मनमोहन सिंग यांनाच दिले पाहिजे. नव-उदारीकरणाच्या सत्तेच्या सर्व घृणास्पद कारस्थानांविरुद्ध व विशेषत: खाजगीकरण तसेच निर्गुंतवणुकीच्या विरोधात व्यापक स्तरावर संघर्ष करावा लागेल. धोरणात्मक मुद्द्यांवरच्या उपरोक्त ५ सूत्री मागण्या ज्यांचे निर्धारण २००९ मध्ये संयुक्त पातळीवर करण्यात आले होते. ह्याच ५ मागण्यांच्या आधारावर २०११ मध्ये झालेल्या संयुक्त श्रमिक संमेलनाने त्यांमध्ये अजून ५ ठोस मागण्यांचा विस्तार करण्यात आला तसेच सरकारला त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे निवेदनही देण्यात आले. ह्या तातडीच्या मागण्यांसाठी देशव्यापी संघर्ष करण्यावर ह्या संमेलनाने जोर दिला. ह्यांमध्ये कंत्राटी कामगारांच्या मागण्या आणि त्याच बरोबर किमान वेतन, बोनस, भविष्य निर्वाह निधी, उपदान, पेन्शन व कामगार संघटनांची नोंदणी आदी मागण्या जोडल्या गेल्या आहेत. • कायम अथवा कायम स्वरूपाच्या कामांचे कंत्राटीकरण करू नये तसेच कंत्राटी कामगारांना त्या उद्योगातील कायम कामगारांच्या समकक्ष वेतन व अन्य सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. बहुतेक आस्थापनांमध्ये कामांच्या कंत्राटीकरण व नैमित्तीकीकरणाने भयावह पातळी गाठली आहे. सरकारच्या स्वत:च्या अंदाजांनुसार ह्या देशातील एकूण श्रमशक्ती पैकी ५१% शक्ती स्वयंरोजगारामध्ये गुंतली आहे. ३३.५% लोक नैमित्तिक श्रम करून आपला गुजारा करतात. त्यांना कोणतेही कायम स्वरूपी किंवा रोजंदारीचे काम उपलब्ध नाही. त्यांना केवळ अचानक मिळणाऱ्या कामावर गुजराण करावी लागते. भारतात मुश्किलीने १५.६ % वेतन मिळवणारे कर्मचारी आहेत. त्यांच्यातील बहुसंख्य कामगार कंत्राटी कामामध्ये आहेत. काही दुर्लभ अपवाद सोडल्यास बहुसंख्य कंत्राटी कामगार किमान वेतन, सामाजिक सुरक्षा व अन्य कामगार कायद्यांच्या लाभापासून वंचित आहेत आणि त्याच्या रोजगारावर कधी कुऱ्हाड कोसळेल ह्याचा काही नेम नसतो. त्यांना मुख्य नियोक्ता किंवा कंत्राटदार दोघांकडूनही कामावरून काढून टाकण्याचा धोका संभवतो. एकाच मालकाकडे एकाच प्रकारचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये असा भेद करणे धोकादायक आहे. कधी कधी कंत्राटी कामगाराला कायम कामगाराच्या मानाने त्याच्या सहावा भागच वेतन मिळते. हा भेदभाव जास्त काळापर्यंत चालू राहिल्यास केवळ कंत्राटी कामगारांचेच तीव्र शोषण होणार नाही तर कायम कामगारांच्या रोजगार व वेतनश्रेणीवर देखील एक नकारात्मक दबाव तयार होऊन तो उत्तरोत्तर वाढत जाईल व त्यांच्यावर देखील वेतनकपातीला तोंड देण्याची पाळी येईल. आपल्या देशातील सकल देशांतर्गत उत्पादन आणि मालक वर्गाचा नफा वाढत असताना वेतनाचा हिस्सा मात्र कमी होण्याचे कारण हेच आहे की दिवसेंदिवस कमी मोबदल्यात जास्त काम करणाऱ्या कामगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. देशातील श्रमिक आंदोलन अनेक वर्षांपासून कंत्राटीकरणाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामगारांच्या तीव्र शोषणाविरुद्ध संघर्ष करत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये तीव्र दमन व काढून टाकण्याच्या कारवाईचा बहादुरीने सामना करत त्यांना संघटीत केले जात आहे व लढाऊ संघर्ष होत आहेत. ह्या संघर्षांमुळे कंत्राटी कामगारांचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर उचलला गेला आणि पूर्ण राष्ट्राचे त्या प्रश्नाकडे लक्ष गेले. त्यामुळेच संयुक्त कामगार आंदोलनाच्या मंचावरून कंत्राटी कामगारांच्या समान वेतनाचा प्रश्न घेतला गेला. नोव्हेंबर २०१० मध्ये झालेल्या ४३व्या भारतीय श्रम संमेलनात देखील हा मुख्य मुद्दा बनवला गेला होता. त्या संमेलनात कायम कामगार व त्यांच्यासारखेच काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना समान वेतन, सेवाशर्ती व लाभ मिळण्यासाठी कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) कायदा १९७० मध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची शिफारस केली गेली, ज्यासाठी केंद्र व राज्य सरकार तसेच कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी सहमती व मालकवर्गाच्या प्रतिनिधींनी मात्र विरोध दर्शवला होता ज्याचे कारण स्पष्ट आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयाने कंत्राटी कामगारांना समान वेतन व अन्य सेवालाभ मिळण्यासाठी ह्या कायद्यात कलम २५(२)(वी)(ए) जोडण्याचा प्रस्ताव मंत्री मंडळाकडे पाठवला. तो मान्य झाला असता तर सरकारवर फक्त १३,००० कोटीचा आर्थिक बोजा पडला असता आणि तो देखील मालक वर्गात विभागून देता आला असता. पण इतका कमी बोजा असून देखील देशातील ७०% उत्पादक श्रम करणाऱ्या व सकल देशांतर्गत उत्पादनात मोलाची भर टाकणाऱ्या ह्या वर्गाला न्याय देण्यासाठी पाऊल पुढे टाकण्याऐवजी उलट मागे घेत आहे. जोपर्यंत सरकार आपला दृष्टिकोण बदलत नाही तोपर्यंत असेच घडत राहणार. . २०,२१ फेब्रुवारी २०१३ च्या २ दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संपाची तयारी करत असताना कामगार संघटनांना तळागाळात पोहोचून कंत्राटी कामगारांमध्ये प्रचार करावा लागेल व त्यांना न्याय नाकारण्यात सरकारची व विशेषतः पंतप्रधान कार्यालयाची किती घाणेरडी भूमिका राहिली आहे हे उघड करावे लागेल. त्यांना हे सांगावे लागेल की त्यांना थोडासा न्याय मिळावा म्हणून श्रम मंत्रालयाने तयार करून पाठवण्यात आलेला ठोस प्रस्ताव पंत प्रधान कार्यालयाकडे पडून आहे. हा प्रस्ताव मंजूर होऊन कंत्राटी कामगारांना दिलासा देण्याऐवजी सरकार मालकवर्गाच्या नाराजीला व त्यांचे हितसंबंध जोपासण्याला जास्त महत्व देत आहे आणि कामगारांच्या लढ्यात त्यांनी मोठ्या संख्येने सामील झाल्याशिवाय व सरकारवर दबाव आणल्याशिवाय कंत्राटी कामगारांना न्याय मिळणार नाही. • सर्व क्षेत्रांमध्ये किमान वेतन निश्चितपणे मिळण्यासाठी अनुसूची/वर्ग यांच्या पलीकडे जाऊन किमान वेतन कायद्यात दुरुस्ती करावी व कायद्याने बंधनकारक असलेले किमान वेतन निश्चित करावे व ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत १०,००० रुपयांपेक्षा पेक्षा कमी असता कामा नये. उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार ऐंशीच्या दशकात देशाच्या उत्पन्नात कर्मचारी, कामगारांच्या वेतनाचा हिस्सा ३०% होता तो कमी होऊन २००९ मध्ये केवळ ९.५% राहिला. मालक वर्गाच्या नफ्याचा हिस्सा मात्र १५% वरून उसळून ५५% झाला. ह्यातून हे स्पष्ट दिसून येते की श्रमिकांच्या कठोर परिश्रमातून तयार झालेल्या उच्च कोटीच्या उत्पादन व सेवांच्या मोठ्या हिश्याची मालकवर्ग लूट करत असतो. वाढत्या महागाईत कमी होत जाणाऱ्या वेतनमूल्यामुळे होणारे अश्या प्रकारचे अमानवीय शोषण कामगार वर्ग कधीही सहन करू शकणार नाही. अनेक राज्यांमधील अनेक उद्योगांमध्ये अजूनही किमान वेतनाचे निर्धारण करण्यात आले नाही. किमान वेतनाच्या पातळीत वेळोवेळी सुधारणा करायची गरज असूनही केली जात नाही. अनेक क्षेत्रांमध्ये किमान वेतन हास्यास्पद पातळीपर्यंत कमी ठेवण्यात आलेले आहे. अनेक किमान वेतन अधिनियामांना न्यायालयात आव्हान देण्यात येऊन स्थगिती मिळवण्यात आलेली आहे. त्यामुळे ते अधिनियम कामगारांसाठी काही कामाचे राहिलेले नाहीत. भारत सरकार आणि राज्य सरकारे श्रमिकांना ज्यांच्यात महिला कामगारांची संख्या फार मोठी आहे, किमान वेतनापासून वंचित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या संशयास्पद क्लुप्त्या करत आहे. ह्या श्रमिकांना अंगणवाडी कर्मचारी, आशा/उषा/लिंक वर्कर, शिक्षण सेवक, रोजगार सेवक, सामाजिक कार्यकर्ता, स्वयंसेविका, मित्र अशी विविध नावे दिली जातात. ह्या श्रमिकांना व कामकाजी महिलांना वेतन दिले जात नाही तर 'मानधन, प्रोत्साहन भत्ता' इत्यादीच्या स्वरूपात एक अल्प रक्कम हातावर टिकवली जाते. संयुक्त श्रमिक आंदोलनाची मागणी आहे अनुसूचीच्या पलीकडे जाऊन सर्व क्षेत्रांमध्ये किमान वेतन लागू करा व त्याची काटेकोर अंमलबजावणी करा. ही रक्कम रुपये १०,००० पेक्षा कमी असता कामा नये. संपाच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये ह्या मागणीला प्राधान्याने उचलले पाहिजे. १४-१५ जानेवारी २०१२ रोजी झालेल्या भारतीय श्रम संमेलनात सर्व कामगारांना किमान वेतनाची हमी मिळण्याच्या दृष्टीने सर्वसंमतीने किमान वेतन अधिनियमात खालील प्रमाणे दुरुस्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. • १५ व्या भारतीय श्रम संमेलनाने (१९५७) सुचवलेले नियम व निकष तसेच १९९२ मधील रेप्टाकोस ब्रेट विरुद्ध कामगार संघटना ह्या मामल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार किमान वेतन ठरवण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत ह्याबाबतीत सर्वसम्मती होती. • ह्या बाबतीत व्यापक सर्वसम्मती होती की सर्व रोजगारांना किमान वेतन अधिनियमाच्या अंतर्गत आणले जावे व सध्याच्या अनुसूचित रोजगारांमध्ये अंमलबजावणीवर असलेले अंकुश समाप्त करावेत. ह्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कन्वेन्शनच्या पृष्ठ क्रमांक १३१ ला समर्थन देण्यात मदत मिळेल. १५व्या भारतीय श्रम संमेलन (१९५७) मधील किमान वेतन निर्धारित करावयाचे निकष खालील बिंदूंवर आधारित होते. • ३ सदस्य असलेल्या एका श्रमिक कुटुंबात प्रती व्यक्ती २७०० उष्मांक मिळण्याइतक्या आहाराची गरज. • दर वर्षी प्रती व्यक्ती १८ वार कपडा. • अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठीच्या सरकारी आवास योजनेत वसूल केल्या जाणाऱ्या किमान भाड्याने आवास मिळण्याची व्यवस्था. • इंधन, प्रकाश आदींसाठी एकूण किमान वेतनातील २०% भाग धरण्यात यावा. १९९२ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात किमान वेतनाचे निर्धारण करताना शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, वृद्धापकाळ, विवाह इत्यादींवर होणारा खर्च गृहीत धरून मूळ वेतनात २५% वाढ करण्यात यावी असा आदेश दिला गेला होता. १५ व्या व ४४ व्या भारतीय श्रम संमेलनांच्या शिफारसीनुसार महागाईच्या सध्याच्या पातळीचा विचार करता १३,००० रुपये इतके किमान वेतन मिळायला हवे. कामगार संघटनांनी तर १०,००० रुपये इतकेच किमान वेतन निर्धारित करण्याची मागणी केलेली आहे. ती अवास्तव आहे काय? एवढेच नाही तर भारतीय श्रम संमेलन एक त्रिपक्षीय मंच आहे. ह्यात कामगार संघटना, मालकांच्या व नियोक्त्यांच्या सर्व संघटना, केंद्र व राज्य सरकारे यांचे प्रतिनिधी सामील असतात. कामगार केलेल्या संयुक्त संघर्षांच्या पार्श्वभूमीवर ४४ वे भारतीय श्रम संमेलन झाले व त्यात सर्व घटकांची सहमती घडवून आणता आली. वास्तविक पाहता कामगार संघटनांनी केलेली किमान वेतनाची मागणी ४४व्या संमेलनात सर्व संमतीने केलेल्या शिफारसीपेक्षा कमीच होती. मग १०,००० रुपये किमान वेतन निर्धारित करण्यात व किमान वेतन अधिनियमात दुरुस्ती करण्यात अडचण काय आहे? सरकार कॉर्पोरेट घराण्यांचे बटिक बनले आहे आणि श्रमिक वर्गाला बळी देऊन भांडवलाच्या हिताची सेवा करण्यात मग्न आहे म्हणूनच श्रम संमेलनातील सर्व सम्मतीच्या शिफारसीला डावलून दुरुस्ती करण्याची टाळाटाळ करत आहे. जनतेच्या किंवा कामगारांच्या बाजूचा आजवरचा कोणताही कायदा कामगार संघटना, श्रमिक वर्ग व आम जनता यांच्या आक्रमक लढयाशिवाय झालेला नाही ह्याला इतिहास साक्षी आहे. आगामी २ दिवसीय सार्वत्रिक संपाच्या प्रचार मोहिमेमध्ये किमान वेतनाच्या मुद्यावर रान उठवून सर्व श्रमिकांना ह्या लढ्यात आणावे लागेल. संयुक्त लढ्याच्या दबावामुळेच सरकार दबेल व ही मागणी मान्य होऊन श्रमिकांना ह्या महागाईत तग धरण्यासाठी आधार मिळेल. • संयुक्त कामगार आंदोलनाची आठवी मागणी आहे सरकारने बोनस, भविष्य निर्वाह निधीच्या पात्रता व देय राशीवर असलेल्या सर्व मर्यादा समाप्त कराव्या. ग्रेच्युईटी च्या रकमेत वाढ करावी. बोनसचा कायदा अतिशय जुना असून त्यात असलेली रुपये ६५०० मासिक वेतन ही कमाल मर्यादा आता कालबाह्य झाली आहे. संघटीत क्षेत्रातील बहुतेक सर्व कामगार आता त्याच्या पात्रतेच्या पलीकडे गेले आहेत. जे पात्र आहेत त्यांना देखील ३५०० मासिक वेतनावर आधारित राशी मर्यादा असल्यामुळे अल्प बोनसवर समाधान मानावे लागते. ह्या मर्यादा दूर करण्याची मागणी कामगार संघटना अनेक वर्षांपासून करत आहेत परंतु सरकारने मात्र ह्या मर्यादा हटवायला नकार दिला आहे त्यामुळे लाखो श्रमिक बोनसच्या लाभापासून वंचित आहेत. बोनसवर मर्यादा घालणारे सरकार मालक वर्गाच्या नफ्यावर मात्र अंकुश घालण्याचा साधा विचार सुद्धा करत नाही. ह्या अन्यायाचे परिमार्जन होण्यासाठी कामगार संघटना बोनस व भविष्य निवाः निधीच्या पात्रता व कमाल राशीवरील मर्यादा हटविण्याची मागणी घेऊन ह्या संयुक्त आंदोलनात उतरल्या आहेत. • संयुक्त श्रमिक आंदोलनाची नववी महत्वाची मागणी आहे वृद्धापकाळी सन्मानाने जगण्याचा हक्क मिळण्यासाठी सर्वांसाठी खात्रीलायक पेन्शनची व्यवस्था करा. श्रमिकांना ज्या काही थोड्या बहुत सामाजिक सुरक्षा उपलब्ध आहेत त्या देखील हिरावून घेण्यासाठी सध्याच्या आर्थिक धोरणांची सत्ता दिवस रात्र एक करत आहे. कर्मचारी व श्रमिकांच्या आता अस्तित्वात असलेल्या पेन्शन च्या अधिकारांवर टाच आणण्याचे खूप मोठे कारस्थान देखील ही सत्ता करत आहे. सिटूने जोरदार विरोध करूनही १९९५ मध्ये सरकारने मोठ्या गाज्यावाज्यात कर्मचारी पेन्शन योजना सुरु केली. ही योजना म्हणजे पेन्शनच्या नावाखाली कर्मचारयांची केलेली एक क्रूर फसवणूक आहे. त्यांनी घेतलेल्या शेवटच्या पगाराच्या मानाने एक क्षुल्लक रक्कम त्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शनच्या रूपाने मंजूर होते जिच्या आधारावर त्यांना पुढील आयुष्य काढणे केवळ अशक्य होऊन बसणार आहे. पेन्शन योजना सुरु झाल्यावर अनेक लाभ देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते पण आता त्यातील अनेक लाभांमध्ये कपात करण्याचे पाऊल सरकार उचलत आहे. दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांना आता मिळत असलेला पेन्शनचा अधिकार हिरावून घेऊन त्यांच्या माथी ही नवीन पेन्शन योजना लादण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्यात स्वतःच्या पगारातून १०% कपात सहन करूनही त्यांना निश्चित अशी रक्कम पेन्शन म्हणून मिळण्याची कोणतीही हमी सरकार घेत नाही. सरकारचे हे प्रतिगामी व विरोधी पाऊल कायदेशीर करवून घेण्यासाठी सरकारने अगोदरच लोकसभेत पेन्शन कोष विकास आणि नियामक प्राधिकरण विधेयक सादर केले आहे. जगभरातील अनुभवांनी हे सिद्ध केले आहे की बाजार कधीही श्रमिकांना निश्चित अश्या पेन्शनची हमी देऊ शकत नाही. नवीन पेन्शन योजना लागू झाल्यास स्थिती अजूनच गंभीर होणार आहे. श्रमिकांनी आपल्या कष्टाच्या कमाईमधून दिलेली रक्कम हे कोष प्रबंधक सट्टाबाजारात झोकून देतील आणि ती रक्कम शून्यावर देखील येऊ शकेल. एवढेच नाही तर असंघटीत क्षेत्रातील श्रमिकांच्या विशाल जनसमुदायाला देखील सरकार ह्याच जाळ्यात ओढू इच्छित आहे व त्यासाठी त्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवत आहे. त्यांना 'स्वावलंबन योजना' ह्या तथाकथित उत्तम योजनेत ३० वर्षांपर्यंत आपल्या अल्प कमाईतून अंशदान द्यायला भाग पाडले जाणार आहे आणि त्यानंतर देखील निश्चित पेन्शन मिळण्याची कोणतीही खात्री सरकारने दिलेली नाही. असंघटीत क्षेत्रातील श्रमिकांसाठी हे देखील सामाजिक सुरक्षा कायद्यासारखेच हे एक मृगजळ ठरणार आहे. त्यांच्या अंशदानातून निर्माण झालेला कोष प्रबंधक व म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सट्टाबाजारात झोकून दिला जाणार आहे. सरकारने नुकताच पेन्शन क्षेत्रातही विदेशी गुंतवणूकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिस्थिती अजूनच गंभीर बनणार आहे. ह्या विदेशी वित्त कंपन्या आधीच अश्याच सट्टेबाजी मुळे निर्माण झालेल्या २००८ च्या मंदी मधून सावरलेल्या नाहीत अश्या स्थितीत त्यांच्या हातात आपल्या श्रमिकांच्या निढळाच्या घामाचा पैसा देणे म्हणजे श्रमिकांना नागवून विदेशी वित्त कंपन्यांचे उखळ पांढरे करण्याचा घाट आहे. अश्या बेभरोश्याच्या कंपन्यांच्या हातात आपल्या देशातील श्रमिकांचे भविष्य देण्याचे कारस्थान करायला पंतप्रधान तयार होतात आणि वर त्यांच्या हातात हा पैसा गेल्यावर श्रमिकांना जास्त पेन्शन मिळेल अश्या भूलथापा देतात. सरकार आणि त्यांनी खरेदी केलेले बुद्धीजीवी फक्त लोकांना फसविण्यासाठी हा तर्क देत आहेत की थेट परदेशी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या आपल्या बरोबर भांडवल घेऊन येतील व आपली भांडवलाची गरज पूर्ण करतील पण ही एक शुध्द थाप आहे. खरे पाहता ह्या कंपन्या भांडवल घेऊन येण्याऐवजी आपल्या श्रमिकांची कमाई लुटून नेतील व स्वतःची भांडवलाची गरज भगवतील. श्रमिकांना मात्र आपली सर्व बचत त्यांच्या घशात घालून वृद्धावस्थेत स्वतः भिकेकंगाल जीवन जगावे लागेल. वृद्धावस्थेतील हा एकमेव आधार हिरावून घेतला जाऊ नये म्हणून श्रमिकांना खंबीर भूमिका घेऊन ह्या नवीन पेन्शन योजनेला व पेन्शन क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीला कडाडून विरोध करावा लागेल. देशातील संघटीत, असंघटीत क्षेत्रातील सर्व श्रमिकांना वृद्धापकाळी सन्मानाने जगण्याइतके पेन्शन मिळण्याची हमी सरकारने दिलीच पाहिजे ह्या मागणीसाठी तीव्र संघर्ष करावा लागेल. • कामगार आंदोलनाची दहावी मागणी आहे अर्ज केल्याच्या ४५ दिवसांच्या आत कामगार संघांना अनिवार्यतः कायदेशीर नोंदणीचा अधिकार मिळाला पाहिजे तसेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कन्वेन्शन क्रमांक ८७ व ९८ ची ताबडतोब पुष्ठी झालीच पाहिजे. हा अधिकार कामगारांच्या संघटीत होण्याच्या व सामुहिक सौदेबाजीच्या मूलभूत घटनात्मक अधिकारांशी जोडलेला आहे. नव उदार धोरणांच्या दबावाखाली सरकार कामगारांच्या ह्या लोकशाही अधिकारांना कात्री लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्या प्रकारच्या अन्याय व दमनाच्या विरोधात कामगारांचा प्रतिरोध दिवसेंदिवस वाढत जात आहे परंतु सत्ताधारी वर्ग हा प्रतिरोध दडपून टाकण्यासाठी वेगवेगळ्या घृणास्पद क्लुप्त्या करत आहे. श्रमिक वर्गाने आपल्यावर होणाऱ्या राक्षसी शोषणाला प्रतिकार करण्यासाठी संघटीत होऊन लढा करू नये, सत्ताधारी वर्गाच्या जन विरोधी व श्रमिक विरोधी धोरणांना आव्हान देऊ नये म्हणून सरकार त्यांच्या संघटीत होण्याच्याच प्रयत्नांना खीळ घालू पाहत आहे. त्यांना आपल्या पसंतीच्या युनियनची निवड करता येऊ नये व मालक धार्जिण्या युनियनमधेच बांधून ठेवता यावे यासाठी देखील सरकार कायद्याच्या वापर करत आहे. . मोठ्या कॉर्पोरेट व विशेषतः बहु राष्ट्रीय कंपन्यांमध्ये तर युनियन होऊच नये यासाठी अनेक नियम करून ठेवले आहेत. त्या क्षेत्रातील नवीन युनियनला पंजीकरणाच्या मूलभूत अधिकारा पासून वंचित ठेवण्याचे देखील कारस्थान करण्यात येते. युनियनचा अर्ज कामगार आयुक्त कार्यालयात महिनोन महिने धूळ खात पडतो व कामगार चकरा मारत राहतात. खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात संघटना बांधण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कामगार नेत्यांना आपली नोकरी देखील गमावण्याची वेळ येते. त्यांना कामावरून काढून टाकले जाते. त्यांच्यावर खोट्या केसेस करून त्यांना पोलीस ठाणे व कोर्ट यांच्या चकरा मारायला लावले जाते. सरकारची सर्व खाती मालकांनी कामगारांवर केलेल्या अन्यायाला पाठीशी घालण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी पुढे होऊन कामगारांवरच कारवाया करतात. हरियानातील मनेसर येथील मारुती सुझुकी, तमिळ नाडूतील ह्युंडाई व फॉक्सवागन अश्या अनेक घटनांमध्ये सरकारी यंत्रणा मालकांच्या मदतीला धावून जाताना आढळली आहे. पूर्वी कधी नाही एवढे आज हे दमन तंत्र तीव्र झाले आहे आणि ह्याचे कारण आहे सरकारचा नव उदार धोरणांना बेशरमपणे पुढे घेऊन जाण्याचा धडाकेबाज कार्यक्रम. हा कार्यक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी सरकार लोकांच्या संघटीत होण्याच्या, लढण्याच्या केवळ कामगार अधिकारांवरच नाही तर जनतेच्या लोकशाही अधिकारांवरच हल्ला करत आहे. हा हल्ला करणे सोपे जावे म्हणून सरकारने अजूनही आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या संघटना बांधणी व सामुहिक सौदेबाजीचा अधिकार देणाऱ्या ८७ व ९८ व्या कन्व्हेनशनवर सह्या करून त्यांची पुष्ठी केलेली नाही. ह्या कामात आता अजून दिरंगाई होता कामा नये. कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने ह्या १० मागण्या व मुद्दे उचलले आहेत. २०,२१ फेब्रुवारीचा देशव्यापी सार्वत्रिक संप ह्याच मुद्यांवर होणार आहे. हे सर्व मुद्दे प्रत्येक श्रमिकापर्यंत, श्रमिकांच्या कामांच्या ठिकाणी, त्यांच्या वस्त्यांवर पोहोचले पाहिजेत. प्रत्येक श्रामिकापर्यंत आपण कश्यासाठी संप करत आहोत त्याचा संदेश पोहोचवण्यासाठी सघन प्रचार केला पाहिजे. संपाच्या तयारीसाठी सर्व कामांच्या ठिकाणी संयुक्त प्रचार मोहिमा घेतल्या पाहिजेत. त्यासाठी नवीन ताकद व उर्जा उभी करून पुढाकार घेतला पाहिजे. ह्या प्रचार मोहिमेच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय स्तरावर झालेली ही एकजूट तळागाळात पोहोचेल आणि संपूर्ण श्रमशक्ती एका मंचावर एकत्र करेल. श्रमिक वर्गाची अशी एकजूट संयुक्त संघर्षाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल आणि शोषक वर्गाच्या आदेशावरून काम करणाऱ्या सरकारांच्या वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात सातत्याने चालणारे जोरदार संघर्ष उभे करू शकेल. आजचे जागतिक आर्थिक संकट १९३० च्या दशकातील पहिल्या आर्थिक संकटाची आठवण करून देत आहे. ह्या संकटामुळे बेरोजगारी, दारिद्र्य, विषमता ह्यासारख्या समस्या सोडवण्यात भांडवलशाही समाज व्यवस्था अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. श्रमिक वर्ग व आम जनता आज ह्याच सर्व समस्यांशी झुंज देत आहे. हे संकट दिवसेन दिवस जास्त तीव्र होत चालले आहे व त्याच बरोबर लोकांचे दुःख, कष्ट देखील वाढत आहेत. जागतिक पातळीवर लोक, विशेषतः श्रमिक, छात्र व युवा रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करत आहेत. इतकेच नाही तर सर्वात जास्त विकसित देशांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. त्याही ठिकाणी रस्त्यावर उतरणारे श्रमिक व युवा अत्यंत समयोचित प्रश्न उचलत आहेत. ते आज प्रश्न विचारतायत की ९९% लोकांचे शोषण करण्याची परवानगी मूठभर १% लोकांना कुणी दिली? मूठभर कॉर्पोरेट घराणी व बड्या भांडवलदारांना नफा कमवून देणाऱ्या श्रमिक जनतेमधील एक विशाल बहुसंख्या दारिद्र्य आणि उपासमारीच्या दगडांखाली भरडली का जात आहे? त्यांना प्रत्येक सुख सुविधांपासून वंचित का ठेवले जात आहे? हे प्रश्न विचारण्यासाठी व त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला श्रमिकांचा लढा एका उच्चतर पातळीवर घेऊन जावा लागेल. तळागाळात जाऊन श्रमिक वर्गाची एकजूट मजबूत करून व संघर्ष तेज करूनच आपण पुढे जाऊ शकतो. हा एकमेव मार्ग आहे. हेच लक्ष्य समोर ठेवून आपल्याला देशव्यापी सार्वत्रिक संपाच्या तयारी मोहिमेत उतरायचे आहे. आपल्याला २०,२१ फेब्रुवारी २०१३ चा संप प्रचंड यशस्वी करून दाखवायचा आहे आणि त्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावायची आहे. हाच दृढ संकल्प आपण सर्व मिळून करुया. २०-२१ फेब्रुवारी २०१३ चा दोन दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संप यशस्वी करा! यशस्वी करा!

Tuesday, December 4, 2012

Historical Mahapadav of Scheme Workers in New Delhi

Historical Mahapadav of Scheme Workers in New Delhi on November 26-27 Parliament sessions are occasions when different sections of people from different places come to Delhi to vent their grievances in the hope that the powers that be will pay some attention. Jantar Mantar near Parliament is the place where some or other protest, dharna or demonstration is held every day during that period. But the ‘mahapadav’ of scheme workers that was held near Parliament was something that Jantar Mantar has not witnessed during at least the last two decades. More than 50000 ‘scheme workers’, most of them women from all over the country thronged the place to raise their voice against the gross injustice meted out to them. They were participating in the massive ‘mahapadav’ organised by the Centre of Indian Trade Unions to highlight their common demands – the demand to be recognised as workers, for minimum wages and social security benefits and regularisation. Braving the cold Delhi winter they sat and slept on the road through the day and night. The ‘mahapadav’ which started at 11.00 AM on 26th November continued till 4.00 PM on 27th November. Workers employed in more than 12 different schemes of government of India including anganwadi workers and helpers employed in the Integrated Child Development Services (ICDS), ASHAs, the link health assistants, second ANMs employed in the National Rural Health Mission, the mid day meal workers, teachers and non teaching staff in the National Child Labour Project, the Krishak Sathis employed under the Agricultural Technology Management Agency (ATMA), para teachers under the Sarva Siksha Abhiyan, Sakti Sahayikas, IKP Animators under the National Rural Livelihood Mission, teachers working under the Kasturba Balka Vidyalaya scheme, Sakshar Bharat, the Grameen Rojgar Sevaks, NREGA field assistants employed in the National Rural Guarantee Act, etc participated in the mahapadav raising the slogan ‘No to honorarium or Incentive; we demand Minimum Wages and Social Security Benefits’ These workers have come from all over the country including from far off states like Arunachal Pradesh, Assam, Kerala, Tamil Nadu, Andhra Pradesh, Karnataka, Odisha, West Bengal, and also from Jammu and Kashmir, in addition to all the ‘Hindi speaking’ states of Bihar, Jharkhand, Chattisgarh, Madhya Pradesh, Maharashtra, Gujarat, Himachal Pradesh, Uttar Pradesh, Uttarakhand, Rajasthan and Delhi with the largest contingents coming from Haryana and Punjab. Around 10000 ‘scheme workers’ from far off places who have reached the national capital earlier and were camping at Ramlila Maidan marched in an attractive and disciplined procession to Jantar Mantar while all the others reached Jantar Mantar directly. Hemalata, secretary, CITU welcomed this unprecedented mobilisation of ‘scheme workers’ being organised by Centre of Indian Trade Unions. Tapan Sen, MP and general secretary of CITU inaugurated the ‘mahapadav’ while AK Padmanabhan, presided. National office bearers of CITU, Neelima Maitra and AR Sindhu, president and general secretary of All India Federation of Anganwadi Workers and Helpers and state level leaders of ASHAs, mid day meal workers were on the dais. Addressing the gathering AK Padmanabhan called upon all the scheme workers to unitedly fight against the neoliberal policies of the government which led to increasing exploitation of all workers. He called upon them to join with all the other sections of the workers to intensify the struggle against these policies. Inaugurating the ‘mahapadav’, Tapan Sen said the government of India was committing a fraud upon the people through its inhuman exploitation of the workers who were providing the most important services related to health, education, food and nutrition for the people, particularly for the poor women and children. The workers who contributed to the human development of the country were forced to starve and suffer because of this atrocious attitude of the government which called them ‘social workers’, ‘activists’, ‘friends’, ‘guests’ etc just to deny them the status of workers. Tapan Sen demanded that these services should be provided as rights and entitlements to all the citizens and not through ‘schemes’ and ‘programmes’ which can be withdrawn any time as per the whims and fancies of the government of the day and that all the workers in different government schemes should be recognised as workers with all the attendant benefits including minimum wages and social security benefits. A team of 11 CITU leaders including Hemalata, Varalakshmi, national secretaries, Mercy Kutti Amma, vice president of CITU, Surender Malik, Pramod Pradhan, Prem Nath Rai, general secretaries of the state committees of Haryana, Madhya Pradesh and Uttar Pradesh respectively, Uma Maheswara Rao, Tapan Sharma, Gajendra Jha and Radha Raman Sarangi, office bearers of the Andhra Pradesh, Assam, Chattisgarh and Odisha state committees of CITU and Deven Patel, leader of the state government employees and anganwadi employees in Chattisgarh started a fast for two days, during the duration of the ‘mahapadav’ in solidarity with the demands of the ‘scheme workers’. AR Sindhu, general secretary of AIFAWH said that the exploitation of the ‘scheme workers’ was the biggest scam in the country. Ranjana Nirula, treasurer of CITU and convenor of the all India coordination committee of ASHAS criticised the government for exploiting the services of lakhs of women workers on the name of ‘social work’. Neelima Maitra, president of AIFAWH spoke on the need of all scheme workers to come together. Leaders of different state committees of CITU and of the different organizations participating in the mahapadav spoke and strongly criticised the government for providing lakhs of crores of rupees as concessions in taxes to the corporates and the rich while arguing that there were no funds for improving the conditions of the workers in its different schemes. Prakash Karat, general secretary of CPI (M) greeted the gathering and expressed full support to their struggle. He said that the government, instead of ensuring the rights of the people to their basic needs of health, education, food and work was starting some schemes without adequate financial allocations. At the same time the around 1 crores workers employed in these schemes were denied their basic rights as workers. There was no difference between the Congress and the BJP led governments as far as the pro rich economic policies were concerned. He commended the scheme workers for displaying exemplary unity irrespective of caste, religion, language, region etc and stressed the need to build a strong movement against the anti people policies of the government. Sitaram Yechury, MP and member of politburo of CPI (M) exhorted the scheme workers to intensify their struggle outside the Parliament while the MPs from the CPI (M) would continue to raise their demands from within the Parliament. He criticised the Prime Minster for not taking effective measures for implementing even his own assurances made several years ago on providing ‘parting gift’ to the anganwadi employees when they demanded pension. Brinda Karat, member of CPI (M) also addressed the gathering and congratulated the large numbers of women workers for their participation in the historic struggle. She criticised the government for claiming to empower women while subjecting lakhs of women workers to such inhuman exploitation. Leaders of several trade unions including Bhatnagar from All India Insurance Employees’ Association, Abhimanyu from BSNL employees’ union, Subhash Lamba from All India State Government Employees’ Association not only greeted the participants expressing their solidarity but also extended financial assistance for the struggle. S Ramachandran Pillai, president and NK Shukla, secretary of AIKS, Sudha Sundararaman, general secretary of All India Democratic Women’s Association, Vijaya Raghavan, general secretary of All India Agricultural Workers’ Union, BK Biju, MP and president of DYFI greeted the mahapadav. K Varada Rajan, general secretary of AIKS, Subhashini Ali, former president of AIDWA and several MPs visited the mahapadav and expressed their solidarity with the scheme workers’ struggle. Eminent economists Prabhat Patnaik and Utsa Patnaik congratulated the CITU for leading the struggle on the demands of the scheme workers and asserted that their demands of recognition of workers and minimum wages of Rs 10000 were most genuine. There was no dearth of financial resources provided the government had the political will. G Sanjeeva Reddy, president of INTUC and Pawan Kumar, organising secretary of BMS also greeted the participants and expressed solidarity. Addressing the mahapadav Hemalata called upon the scheme workers to intensify the struggle on their common demands. She called upon the scheme workers to strengthen their unity and help one another to organise. She warned that if the government did not concede to the genuine demands of the scheme workers next time they would come in lakhs and not in thousands. Concluding the historic mahapadav, Tapan Sen said that the CITU was determined to continue the struggle on the demands of recognition as workers, minimum wages of Rs 10000, social security benefits and regularisation of scheme workers. He called upon them to join the courting of arrest on 18 – 19 December and March to Parliament on 20th December and in the all India general strike on 20 – 21 February 2013. Delhi state committees of CITU and CPI (M) made untiring efforts for the success of the mahapadav. Jana Natya Manch presented songs and street plays in solidarity with the demands of the scheme workers. The mahapadav was made vibrant with the songs and dances which went on throughout the night despite the cold and chill. The unity in diversity characteristic of the country was in full display with workers from different states rendering songs in different languages and speakers addressing the gathering in different languages. The mahapadav enthused not only the participants but also the entire trade union and democratic movement in the country. The grit and determination of the workers, particularly the women workers who came in such large numbers, travelling for 2- 3 days and spending the day and night on the street in the cold with hardly anything to protect themselves demonstrated their fighting spirit. Now, this spirit of struggle and unity has to be carried forward to build a strong organisation and further intensify the struggles against exploitation and for a just society.

२६, २७ नोव्हेंबर ला नवी दिल्ली येथे योजना कर्मचाऱ्यांचा अभूतपूर्व महापाडाव

लोकसभेचे सत्र चालू असताना देशभरातून रोज वेगवेगळ्या विभागातील लोक सरकारचे लक्ष वेधण्याच्या आशेने आपापले प्रश्न घेऊन दिल्लीला येत असतात. लोकसभेपासून थोड्याच अंतरावर असलेल्या जंतर मंतर येथे सततच अश्या विविध समाज विभागातील लोकांची निदर्शन, धरणे, मोर्चा आदी विरोध प्रदर्शने होत असतात. परंतु योजना कर्मचार्यांच्या महापाडावासारखा कार्यक्रम जंतर मंतर ने गेल्या किमान २ दशकांमध्ये पाहिला नसेल. ५०,००० हून अधिक 'योजना कर्मचारी' ज्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी जमले होते. हे सर्व सिटू ने त्यांच्या कर्मचारी म्हणून मान्यता, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि नियमितीकरण ह्या समान मागण्यांवर आयोजित केलेल्या महापाडावात सहभागी होण्यासाठी आले होते. २६ तारखेला सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या व दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत चालू राहिलेल्या ह्या महापाडावात हे सर्व कर्मचारी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता दिवस रात्र बसून राहिले. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत काम करणाऱया अंगणवाडी सेविका व मदतनीस, राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य अभियानात काम करणाऱ्या आशा, लिंक वर्कर; मध्यान भोजन कर्मचारी, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शेतकी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेत (ATMA) काम करणारे कृषक साथी, सर्व शिक्षा अभियानातील शिक्षण सेवक, शक्ती सहायिका, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानातील कर्मचारी, कस्तुरबा बालिका विद्यालय योजना, साक्षर भारत आदिमधील शिक्षक, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यातील रोजगार सेवक असे जवळजवळ १२ वेगवेगळ्या शासकीय योजनांमध्ये काम करणारे कर्मचारी ' नको मानधन, नको प्रोत्साहन भत्ता, आमची मागणी किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा' अशी घोषणा देत सामील झाले होते. हे कर्मचारी अरुणाचल प्रदेश, आसाम, केरळ, तमिळ नाडु, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर सारख्या दूरच्या राज्यांसहित बिहार, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, आणि दिल्ली सारखी 'हिंदी भाषिक' राज्ये आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवणारे पंजाब व हरियाणा ह्या राज्यांमधून आलेले होते. लांबवरच्या राज्यांमधून आधीच राजधानीत पोहोचलेल्या व रामलीला मैदानात तळ ठोकून राहिलेल्या सुमारे १०,००० कर्मचाऱ्यांनी २६ तारखेला सकाळी तिथून जंतर मंतर पर्यंत शिस्तबद्ध व चित्ताकर्षक मोर्चा काढला व उर्वरित कर्मचारी थेट जंतर मंतरलाच आले. सिटू च्या राष्ट्रीय सचिव कॉ हेमलता यांनी सिटूने संघटीत केलेल्या योजना कर्मचाऱ्यांच्या वतीने जंतर मंतर येथे प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. सिटूचे महासचिव व खासदार तपन सेन यांनी महापाडावाचे उदघाटन केले तर सिटूचे अध्यक्ष कॉ एके पद्मनाभन हे अध्यक्षस्थानी होते. सिटूचे राष्ट्रीय पदाधिकारी, अंगणवाडी फेडरेशनच्या अध्यक्ष नीलिमा मैत्रा, महासचिव एआर सिंधू, अन्य पदाधिकारी, आशा समन्वय समितीच्या नेत्या रंजना निरुला मध्यान भोजन योजना व आशाचे विविध राज्यांतील नेते मंचावर उपस्थित होते. सभेला संबोधित करत असताना कॉ एके पद्मनाभन यांनी सर्व कामगार, कर्मचाऱ्यांच्या वाढत्या शोषणाच्या मुळाशी असलेल्या शासनाच्या नवउदार धोरणांविरुद्ध एकत्रितपणे संघर्ष उभारण्याचे तसेच कामगारांच्या अन्य विभागांशी एकजूट करून ह्या धोरणांविरुद्ध लढा तीव्र करण्याचे आवाहन केले. महापाडावाचे उदघाटन करत असताना कॉ तपन सेन म्हणाले "शासन आरोग्य, शिक्षण, लोकांचे व विशेषत: गरीब स्त्रिया व बालकांचे अन्न व पोषण विषयक अत्यंत महत्वाची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अमानवी शोषणाद्वारे जनतेची फसवणूक करत आहे. देशाच्या मानवी विकासासाठी मोलाची कामगिरी करणारयांना कर्मचाऱ्यांचा दर्जा नाकारण्यासाठीच 'सामाजिक कार्यकर्त्या, मित्र, पाहुणे' ही नावे देऊन त्यांना उपासमारीला तोंड देण्यास भाग पादानारीपाडले जात आहे." तपन सेन यांनी ह्या सर्व सेवा जनतेला 'योजनां किंवा कार्यक्रमांच्या' माध्यमातून नव्हे तर त्यांचा अधिकार म्हणून देण्याची व ह्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता व किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लाभ देण्याची मागणी केली. राष्ट्रीय सचिव हेमलता व वरलक्ष्मी, उपाध्यक्ष मर्सी कुट्टी अम्मा, हरियाणा, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यांचे सिटू महासचिव, सुरेंदर मलिक, प्रमोद प्रधान व प्रेम नाथ रायआंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगढ व ओडिशा राज्यातील सिटूचे पदाधिकारी उमा महेश्वर राव, तपन शर्मा, गजेंद्र झा आणि राधा रमण सरंगी तसेच छत्तीसगढ राज्य सरकारी कर्मचारी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नेते देवेन पटेल अश्या ११ नेत्यांनी योजना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी महापाडावाच्या दरम्यान २ दिवसांचे उपोषण केले. अंगणवाडी फेडरेशनच्या महासचिव एआर सिंधू म्हणाल्या की योजना कर्मचाऱ्यांचे शोषण हा देशातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे. सिटूच्या खजिनदार व आशा समन्वय समितीच्या निमंत्रक रंजना निरुला यांनी समाजसेवेच्या नावावर लाखो महिला कर्मचाऱ्यांच्या श्रमाचे शोषण करण्याच्या शासनाच्या कारस्थानावर कडाडून टीका केली. अंगणवाडी फेडरेशनच्या अध्यक्षा नीलिमा मैत्रा यांनी सर्व योजना कर्मचाऱ्यांनी एकत्र येण्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. वेगवेगळ्या राज्यांमधील सिटूच्या नेत्यांनी तसेच योजना कर्मचाऱ्यांच्या राज्य पदाधिकार्यांनी आपल्या भाषणामधून शासनानी एका बाजूला कॉर्पोरेट कंपन्यांना व श्रीमंतांना कोट्यावधी रुपयांच्या कर सवलती देण्याच्या आणि त्याच वेळेला शासनाच्याच विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी मात्र शासनाकडे कधीच निधी उपलब्ध नसण्याच्या दोन वास्तवांमधील परस्पर संबंधावर जोर दिला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ प्रकाश कारात यांनी योजना कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या लढ्याला पूर्ण पाठींबा व्यक्त केला. त्यांनी म्हटले की लोकांचे आरोग्य, शिक्षण, पोषण व रोजगार बाबतचे मूलभूत अधिकारांची पूर्ण हमी घेण्याऐवजी शासन पुरेश्या निधीची व्यवस्था न करता केवळ काही थातूर मातूर योजना सुरु करत आहे. त्याच वेळेला ह्या योजनांमध्ये काम करणारया जवळ जवळ १ कोटी कर्मचाऱ्यांना मात्र त्यांचे मूलभूत अधिकार देखील नाकारत आहे. कॉंग्रेस आणि भाजपा दोघांच्या मध्ये श्रीमंतांच्या बाजूची आर्थिक धोरणे घेण्याच्या बाबतीत काहीच फरक नाही. त्यांनी योजना कर्मचाऱ्यांनी जात, धर्म, भाषा, प्रांत ह्या सर्वांच्या पलीकडे जाऊन एकजूट केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व शासनाच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात सशक्त लढा उभारण्याचे आवाहन केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पोलिट ब्युरो सदस्य खासदार सीताराम येचुरी यांनी योजना कर्मचाऱ्यांनी लोकसभेबाहेर रस्त्यावरचा लढा तीव्र करावा व त्याचवेळी माकपचे खासदार लोकसभा व राज्यसभेच्या पटलावर त्यांच्या मागण्यांचा विषय मांडून आवाज बुलंद करतील असे जाहीर केले. त्यांनी पंतप्रधानांनी स्वत:च काही वर्षांपूर्वी जेंव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन केले असता त्यांना 'बिदाई तोहफा' देण्याचे मान्य केले होते परंतु गेल्या ६/७ वर्षांत त्यांनी स्वत:चे आश्वासन पाळण्यासाठी कोणतीही पावले उचलली नसल्याबद्दल कडक शब्दात टीका केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पोलिट ब्युरो सदस्या व माजी खासदार बृन्दा कारात यांनी देखील महिला कर्मचाऱ्यांच्या लढ्यातील अभूतपूर्व सहभागा बद्दल त्यांचे अभिनंदन केले व महिलांचे सक्षमीकरण करण्याचा खोटा दावा करणारया परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच सेवेत असलेल्या लाखो महिला कर्मचाऱ्यांचे अमानवी शोषण करण्याच्या दुटप्पी धोरणाचा निषेध केला. ह्या महापाडावात महाराष्ट्राचा सहभाग लक्षणीय होता. अंगणवाडी, आशा, मध्यान भोजन, ग्रामीण रोजगार हमी, बाल कामगार शिक्षण अश्या क्षेत्रातील योजनांमध्ये काम करणारे कर्मचारी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने सामील झाले. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, बुलडाणा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई आदी जिल्ह्यांमधून सुमारे २५०० कर्मचारी सामील झाले यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मंचावर राज्याच्या वतीने शुभा शमीम व विजय गाभणे उपस्थित होते व त्यांनी जोशपूर्ण भाषणे केली. कॉ अमृत मेश्राम, सीताराम लोहकरे, पंजाबराव गायकवाड, कल्पना शिंदे, श्रीमंत घोडके, माणिक अवघडे, आनंदी अवघडे, उमेश देशमुख, आरमायटी इराणी असे सिटूचे अनेक पदाधिकारी व नेते लोकांना मोठ्या प्रमाणावर घेऊन महापादावात सामील झाले होते. अखिल भारतीय विमा कर्मचारी संघटनेचे कॉ भटनागर, बी एस एन एल कर्मचारी संघटनेचे कॉ अभिमन्यु, अखिल भारतीय राज्य सरकारी संघटनेचे सुभाष लांबा, यांनी फक्त एकजूट आणि पाठींबाच व्यक्त केला नाही तर महापाडावाला आर्थिक मदतही केली. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष एस रामचंद्रन पिल्लै व चिटणीस एन के शुक्ला; अखिल भारतीय अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महासचिव सुधा सुंदररमण, अखिल भारतीय शेतमजूर युनियनचे सरचिटणीस कॉ विजय राघवन, डी वाय एफ आय चे अध्यक्ष खासदार बी के बिजु या नेत्यांनी यांनी महापाडावाला संबोधित केले. अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस के वरद राजन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या माजी अध्यक्षा सुभाषिनी अली तसेच अनेक खासदारांनी महापाडावाला भेट देऊन पाठींबा व्यक्त केला. प्रख्यात अर्थतज्ञ प्रभात पटनाईक व उत्सा पटनाईक यांनी ह्या महत्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल आणि योजना कर्मचाऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व केल्याबद्दल सिटूचे अभिनंदन केले. त्यांनी सर्व कामगारांना रु. १०,००० किमान वेतन मिळाले पाहिजे ही मागणी रास्त असून तिला पाठींबा जाहीर केला. त्यांनी हे देखील सांगितले की त्यासाठी लागणारा निधी उभा राहू शकतो परंतु सरकारची राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. महापाडावाला इंटक चे अध्यक्ष जी संजीवा रेड्डी व बी एम एसचे संघटक सचिव पावन कुमार यांनी भेट दिली व आपला पाठींबा व्यक्त केला. हेमलता यांनी योजना कर्मचाऱ्यांचा समान मागण्यांवरील लढा अजून तीव्र करण्याचा व खालपर्यंत नेण्याचे तसेच संगठीत होण्यासाठी एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या भाषणात सरकारला हा इशारा दिला की योजना कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढच्या वेळी हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने हे कर्मचारी दिल्लीवर चाल करून येतील. महापाडावाचा समारोप करताना कॉ तपन सेन यांनी योजना कर्मचाऱ्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, रु. १०,००० किमान वेतन, सामाजिक सुरक्षा लाभ आणि योजना कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण ह्या मागण्यांसाठी लढा अजून तीव्र करण्याचा सिटूचा निर्धार व्यक्त करत सर्व कर्मचाऱ्यांना १८-१९ डिसेंबरच्या जेल भरो आंदोलनात तसेच २०-२१ फेब्रुवारी ला होणाऱ्या देशव्यापी संपात संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याचे आवाहन केले. महापाडावाची उत्तम व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी दिल्ली राज्य सिटू कमिटी व माकपचे आभार मानले. लढ्याशी एकजूट दर्शविण्यासाठी जन नाट्य मंचाने क्रांतिकारी गीते व पथनाट्ये सादर केली. विविध राज्यातील महिलांनी कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता रात्री उशिरापर्यंत आपापल्या राज्यातील लोकनृत्ये व विविध भाषेतील लोकगीते व क्रांतिकारी गीते सादर केली व भारतातील सांकृतिक विविधतेचे व एकतेचे उत्तम प्रदर्शन घडवून आणले. आपापल्या भाषेत त्यांनी केलेली भाषणे देखील ह्या लढ्याची राष्टीय पातळीवरील एकजूट दर्शवत होती. ह्या महापाडावामुळे फक्त सहभागी कर्मचाऱ्यांमधेच नव्हे तर संपूर्ण कामगार चळवळीतच तसेच देशातील जनवादी चळवळीमध्ये उत्साह निर्माण केला व योजना कर्मचाऱ्यांचा लढण्याचा निर्धार पाहून वातावरणात एक जोश निर्माण झाला. योजना कर्मचाऱ्यांचा विशेषत: अनेक अडचणींवर मात करून २-३ दिवस प्रवास करून, जवळ फारसे गरम कपडे नसतानाही भर थंडीत रात्रंदिवस महापाडावात नेटाने बसून राहिलेल्या महिला कर्मचाऱ्यांची लढण्याची चिकाटी व निर्धार बघता येत्या काळात सिटूच्या झेंड्याखाली योजना कर्मचाऱ्यांच्या संघटना व लढा बळकट होईल व त्याना न्याय्य हक्क नाकारणाऱ्या शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत यात कोणतीच शंका राहिली नाही.