Wednesday, September 28, 2011
पुणे जिल्हा घरकामगार संघटनेचे दुसरे अधिवेशन संपन्न
पुणे जिल्हा घरकामगार संघटनेचे दुसरे अधिवेशन संपन्न
24 सप्टेंबर 2011 रोजी पुणे जिल्हा घरकामगार संघटनेचे दुसरे अधिवेशन निवारा सभागृह, नवी पेठ येथे अत्यंत उत्साहात पार पडले. अधिवेशनाला 400 महिला घरकामगार प्रतिनिधी उपस्थित होत्या. मालविका झा व हिराबाई घोंगे यांनी गायलेल्या रक्ताने ग रंगलेला लाल बावटा ही ओवी व काही क्रांतीगीतांनी स्फुर्तीदायक वातावरणात अधिवेशनास सुरवात झाली. क्रांतीगीतांनंतर सावित्रीबाई फुले, विमलताई रणदिवे, अहिल्याताई रांगणेकर, कालिंदीताई देशपांडे यांच्या प्रतिमांना हार घालण्यात आले. संघटनेच्या सरचिटणीस सरस्वती भांदिर्गे यांनी प्रस्ताविक केले व अध्यक्षा किरण मोघे यांनी शोकप्रस्ताव मांडला व आपल्यापासून काळाने हिरावून घेतलेल्या सर्व दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी अध्यक्षमंडळाची निवड करण्यात आली. बानूबी शेख, कविता आंब्रे, माया चव्हाण, हिराबाई घोंगे व किरण मोघे यांच्या अध्यक्षमंडळाने सुत्रे हातात घेतल्यावर अधिवेशनाच्या कामकाजास सुरवात झाली.
अधिवेशनाला उद्घाटक म्हणून लाभलेल्या सी आय टी यु चे राज्य सरचिटणीस कॉ डॉ डी एल कराड यांनी अत्यंत स्फुर्तीदायक भाषणाने अधिवेशनाचे रीतसर उद्घाटन केले. त्यांनी आपल्या भाषणामधून घरकामाचे समाजासाठी असलेले महत्व व घराबाहेर पडून अर्थार्जन करणाऱ्या वर्गाच्या खर्च झालेल्या शक्तीचे पुनर्भरण करण्यासाठीचे घरकामगारांचे योगदान, शासनाची ह्या कामगारांप्रतीची उदासीनता, आपल्या 8 वर्षांच्या अविरत लढ्यामुळे मंजूर झालेला तुटपुंजा का होईना पण काही मर्यादित दिलासा देणारा 2008 चा कायदा, त्यातील सिटूचे राज्य अध्यक्ष व माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांची विधानसभेतील अत्यंत महत्वपूर्ण भूमिका, घरकामगारांसाठी किमान वेतनासहित सर्व कामगार कायदे लागू करण्याची आवश्यकता व त्यासाठी करावयाचा लढा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व घरकामगारांना जास्तीत जास्त सभासद संख्या वाढवण्याचे व अगदी शेवटच्या घरकामगारापर्यंत पोहोचून सर्वांना मंडळात नोंदित करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन केले.
रीतसर उद्घाटन झाल्यावर अघिवेशनाच्या नियमित कामकाजास सुरवात झाली. सचिव सरस्वती भांदिर्गे यांनी मागील 4 वर्षांच्या कामाचा अहवाल मांडला. कायद्यासाठी व कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी झालेले लढे, जनश्री विमा योजनेचा लाभ सभासदांपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेनी केलेली धडपड, घरकामगारांवर मालक व पोलिसांकडून झालेल्या अत्याचारांच्या व अन्यायाच्या घटनांमध्ये संघटनेनी योग्य हस्तक्षेप करून मिळवून घेतलेला न्याय या सर्व कामाचा अहवाल मांडला.
रेखा कांबळे यांनी संघटनेचा 4 वर्षांचा जमा, खर्चाचा अहवाल मांडला.
सर्व प्रतिनिधींनी एकमताने अहवाल व हिशोब मंजूर केला.
अधिवेशनात खालील ठराव करण्यात आले-
• घरेलू कामगार अधिनियम 2008 च्या अंमलबजावणीबाबत- जिल्हा स्तरीय मंडळाचे गठन, विकेंद्रित नोंदणी पद्धती, पुरेशी प्रसिद्धी, संगणीकृत फोटो व ओळखपत्र, अनुदानात 200 कोटी रुपयापर्यंत वाढ, मालकवर्गावर उपकर लावून निधीत भरीव वाढ, पेन्शन, मातृत्व लाभ, आरोग्य अनुदान, शैक्षणिक अनुदान व निवारा हया सर्व योजना लागू कराव्यात.
• इंधन दरवाढ व महागाई करणाऱ्या शासनाचा धिक्कार करा, रेशनव्यवस्था बळकट करा.
• जनश्री विमा योजनेतील शिष्यवृत्तीचा लाभ सर्वांना द्या व मनमानी कारभार बंद करा.
• घरकामगारांचे किमान वेतन निश्चित करण्यासाछी किमान वेतन समिती गठित करा.
• 8 नोव्हेंबरच्या देशव्यापी आंदोलनात सामील व्हा.
सिटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ अजित अभ्यंकर व जिल्हा सचिव कॉ वसंत पवार यांनी मार्गदर्शन केले व कामगार आयुक्त कार्यालयातील कामकाजाबद्दल माहिती दिली तसेच मंडळातील नोंदणीच्या कामात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
स्मरणिकेचे प्रकाशन- अधिवेशनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन सिटूच्या नेत्या व नाशिक महानगरपालिकेतील लढाऊ नगरसेविका कॉ वसुधा कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
अधिवेशनात पुणे जिल्हा घरकामगार संघटनेची त्रिस्तरीय समितीची निवड करण्यात आली.
- कमिटीचे सदस्य –
विभाग जिल्हा कौन्सिल व जिल्हा समिती
सिंहगड रोड- अंजना मगर, चाँदबी शेख, कमल साळुंखे, मंजुश्री पळसकर, वैशाली कांबळे, चंद्रभागा महाले,
रजनी बेल्सारकर, मीना दिवटे, स्मिता तांदळकर, सुरेखा कदम, आशा पानसरे, सुनिता
संगनाळे, जया घाडगे, रेखा कांबळे, सावित्रा कांबळे, शोभा तुपारे, सरुबाई थोपटे, सुनंदा
चोरघे, सरिता कदम, कमल नागरे, संध्या सोनावणे, नीलम जाधव, लता लोंढे, चंद्रभागा
वारुशे, अनुराधा गायकवाड, गायत्री हंगरगी, गजराबाई राजगुरु
कोथरूड- ताराबाई चव्हाण, संगिता लोळगे, सुलोचना चव्हाण, संजना मगर, शारदा कांबळे, गंगा
कांबळे, राधाबाई वाघमारे, गीताबाई शिंदे, सुनिता घोडके, कांता मेणे, बानुबी शेख, विजया
बोडके, कमल विटकर, संगिता मोरे, इंदुबाई मुरगुंड, नंदिनी कवडे
डेक्कन- सरुबाई कदम, सोनाबाई कदम, राधा शेटे अनुजा घाणेकर
पेठा- मंदा नितनवरे, सुनंदा खेंगरे, शैला कदम, शकुंतला कोतापल्ली, प्रिती शिळमकर, आशा
निंबाळकर, साधना साळुंखे, निर्मला रजपूत, पद्मा शिंदे, खातून सय्यद, कल्पना हर्डिकर,
शर्मिला जाधव, शकुंतला देशमुख
कात्रज- गीता सरोदे, लता सरोदे, मुक्ता बरबडे, फैय्याज भाभी, राजश्री पुठ्ठेवाड, सुनिता इंगळे,
लीलावती बनसोडे, कांचन वाल्गुडे, कविता आंब्रे, जयश्री साळुंखे, संगिता विश्वकर्मा
कोंढवा- लता काकडे, संगिता केंद्रे, मंगल राजगुरु,
हडपसर- शालन देवकर, शोभा सोनावणे, सुनिता थोरबोले, शहनाज मणियार, कुलसुमबी सय्यद,
चांगुणा नरके, झकिया तत्तापुरे, सुभद्रा सुतार
येरवडा- उर्मिला पवार, छाया साळवे, आशा रत्नपारखे, कल्पना पंडित, अरुणा रसाळ, शकुंतला वस्माने,
वर्षा आमले, कौसल्या साबळे, रुक्मिणी बोयने, अंबिका शिताप, कांताबाई कांबळे, अनुसुया
सातपुते, शालन धोत्रे
ताडीवाला रोड- माया चव्हाण, वैशाली ओव्हाळ
पाषाण- रुक्मिणी क्षिरसागर, अंजना कटारनवरे, शकुंतला मिसाळ मंगल रणपिसे
राजगुरुनगर, दौंड- रिक्त -----
पिंपरी- चिंचवड- अपर्णा दराडे, अनुराधा रोकडे
मानसेवी सभासद - किरण मोघे, सरस्वती भांदिर्गे, सुभद्रा खिलारे, वसंत पवार, शुभा शमीम
सचिव मंडळ व पदाधिकारी
अध्यक्ष- किरण मोघे
उपाध्यक्ष- वसंत पवार, शुभा शमीम, कांता मेणे, शालन धोत्रे, पद्मा शिंदे, चांगुणा नरके, जयश्री
साळुंखे, रुक्मिणी बोयने, राधाबाई वाघमारे, शोभा तुपारे, निर्मला रजपूत, सावित्रा कांबळे,
हिराबाई घोंगे, सुभद्रा खिलारे
सचिव- सरस्वती भांदिर्गे
सहसचिव- संगिता केंद्रे, माया चव्हाण, झकिया तत्तापुरे, खातून सय्यद, सुनिता घोडके, विजया
बोडके, संगिता विश्वकर्मा, कांता कांबळे, अपर्णा दराडे, नीलम जाधव
खजिनदार- रेखा कांबळे
सल्लागार- अजित अभ्यंकर, उषा दातार
शेवटी महाराष्ट्र राज्य घरकामगार समन्वय समितीच्या सचिव शुभा शमीम यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी संघटनेच्या पुढील कार्यावर भर दिला. प्रत्येक वस्तीत सभासद मोहीम घेऊन नवीन सभासद व जुन्या सभासदांचे नुतनीकरण करून घेणे. संघटनात्मक बांधणी पक्की करण्यासाठी वस्त्यांमध्ये शाखा बळकट करणे. कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा करून संघटनेच्या सर्व सभासदांना मंडळात नोंदित करून ओळखपत्र मिळवून घेणे. जिल्हा स्तरीय मंडळ स्थापन करून घेण्यासाठी पाठपुरावा करणे. जनश्री विमा योजनेत जास्तीत जास्त सदस्य नोंदवणे. राष्ट्रीय स्वास्थ बीमा योजनेची अंमलबजावणी करून घेणे. सभासदांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठामार्फत शैक्षणिक अभ्यासक्रम चालवणे. ह्या सर्व कार्यासाठी संघटनेच्या सभासदांनी कंबर कसण्याचे आवाहन करून त्यांनी अधिवेशनाचा समारोप केला.
Subscribe to:
Posts (Atom)