Sunday, April 17, 2011

13 डिसेंबर 2010- नागपूर विधानसभा अधिवेशनवर आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा


13 डिसेंबर 2010- नागपूर विधानसभा अधिवेशनवर आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा

केंद्र शासनाने ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील गोरगरीब नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे, सर्व बाळंतपणे दवाखान्यात होण्याची निश्चिती करवून मातामृत्युचा दर कमी करणे, साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवणे, किरकोळ आजारपणांमधे गावातच तातडीने औषधोचार देणे, कुटुंब नियोजनाचे उद्दीष्ट पूर्ण करणे, लसीकरण अश्या 20 कामांसाठी राष्ट्रीय ग्रामीण अभियाना अंतर्गत आशांची नेमणूक केली आहे. आम जनतेच्या आरोग्याची मूलभूत गरज भागवण्याचे अत्यंत महत्वाचे काम करणाऱ्या आपल्यासारख्या आशांना मात्र या कामासाठी साधे मानधनही दिले जात नाही. प्रत्येक कामासाठी जो काही मोबदला देण्याचे शासनाने मान्य केले आहे तोही स्थानिक अधिकारी व ए एन एम संगनमत करून हिरावून घेतात. ह्या अन्यायाविरुद्ध आपण आता संघटित झालो आहोत व खालील मागण्यांवर जिल्हा परिषद व विधानसभेच्या नागपूर येथील अधिवेशनावर मोर्चा काढणार आहोत.
• राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कायम करा.
• आशांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. तोपर्यंत रु 3000 मानघन द्या.
• आशांना नेमून दिलेल्या सर्व कामांचा मोबदला आशांनाच मिळाला पाहिजे.
• आशांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र खोली द्या. आशांना सन्मानाने वागवा.

No comments:

Post a Comment