Monday, April 18, 2011

साखरी नाटे येथील गोळीबाराचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध

कृपया प्रसिद्धिसाठी

साखरी नाटे येथील गोळीबाराचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध
उद्याच्या बंदला पाठिंबा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक जनतेवर साखरी नाटे येथे झालेल्या गोळीबाराचा आणि या गोळीबारास जबाबदार असलेले कॉन्ग्रेस- राष्ट्रवादी सरकार व त्यांच्या पोलिसांचा आज तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. आणि या अमानुष दडपशाहीविरुद्ध उद्या होणाऱ्या बंदला पाठिंबा देण्यात आला.

18 व 19 एप्रिल रोजी बेलापूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीची बैठक सुरु असताना नाटेतील पोलीस गोळीबाराची बातमी आली. बैठकीतील अन्य विषयांवरील चर्चा थांबवून निषेधाचा हा ठराव मंजूर करण्यात आला.

जपान येथील फुकुशिमा अणु प्रकल्पातील गळती व मनुष्यहानीच्या पार्श्वभूमीवर जैतापूर अणु प्रकल्पाला होत असलेला विरोध गांभिर्याने घेण्याऐवजी धमक्यांची भाषा वापरणाऱ्या मंत्र्यांच्या चिथावणीनेच आजचा गोळीबार झाला आहे असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.
जैतापूर परिसरातील सर्व शासकीय दडपशाही ताबडतोब बंद करावी आणि जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीचा पुनरुच्चार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी करीत आहे.


डॉ अशोक ढवळे
राज्य सचिव
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

No comments:

Post a Comment